तु्म्हाला तोंडात 'ही' लक्षणं दिसली तर सावधान! असू शकतो ब्लॅक फंगसचा धोका...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 08:01 PM2021-06-03T20:01:31+5:302021-06-03T20:06:27+5:30

रुग्णालयातील आयसीयुमध्ये अस्वच्छ अवस्थेत राहिलेल्या रुग्णांना या ब्लॅक फंगसचा धोका अधिक असतो. तुमचे तोंड ब्लॅक फंगसची लक्षणे दाखवू शकतं.

If you see 'these' symptoms in your mouth, beware! There may be a risk of black fungus ... | तु्म्हाला तोंडात 'ही' लक्षणं दिसली तर सावधान! असू शकतो ब्लॅक फंगसचा धोका...

तु्म्हाला तोंडात 'ही' लक्षणं दिसली तर सावधान! असू शकतो ब्लॅक फंगसचा धोका...

googlenewsNext

कोरोना बरा झाल्यानंतर अनेकांना सगळ्यात ब्लॅक फंगसचीच भीती वाटते. सध्या या आजाराच्या प्रमाणात भरपूर वाढ झालेली आहे. रुग्णालयातील आयसीयुमध्ये अस्वच्छ अवस्थेत राहिलेल्या रुग्णांना या ब्लॅक फंगसचा धोका अधिक असतो. तुमचे तोंड ब्लॅक फंगसची लक्षणे दाखवू शकतं. ही लक्षणं खाली दिली आहेत...
जबड्याच्या हाड दुखणे
ब्लॅक फंगसच्या रुग्णांमध्ये सर्वात प्रथम दिसणारे लक्षण म्हणजे जबड्याचे हाड दुखणे. दातांमध्ये संक्रमण वाढल्यामुळे जबड्याचे हाड दूखू शकते. जर तुम्हाला जबड्यांमध्ये दुखण्यासोबतच जर लाल डोळे व डोकेदुखी असा त्रास होत असेल तर डॉक्टरकडे त्वरित धाव घ्या.


गाल आणि तोंड सुन्न होणे
गाल किंवा तोंड सुन्न होणे, तोंडातील मांसपेशींमध्ये कमजोरी जाणवणे अशी लक्षण दिसल्यास हे ब्लॅक फंगसचे लक्षण असु शकते. यातील कोणतेही लक्षण दिसल्यास तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्यावा.


हिरड्यांमध्ये फोड येणे
ब्लॅक फंगसमुळे हिरड्यांमध्ये फोड येऊ शकतो. यामुळे तोंडाला सुजही येऊ शकते. तसेच तुमच्या जीभेची चवही बदलू शकते. त्यामुळे हे संक्रमण रोखण्यासाठी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.


जिभेचा रंग बदलणे
जर तुमच्या जिभेचा, हिरड्यांचा तसेच ओठांचा रंग बदलेला वाटत असेल तर हे ब्लॅक फंगसचे लक्षण असू शकते. याचे कारण जाणून घेण्यासाठी त्वरीत डॉक्टरकडे जा.

Web Title: If you see 'these' symptoms in your mouth, beware! There may be a risk of black fungus ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.