फळांची आणि भाज्यांची साल फेकून द्याल तर पस्तावाल, फायदे असे की तुम्ही व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 08:51 PM2021-06-24T20:51:27+5:302021-06-24T20:53:25+5:30
आपण फळे व भाज्या कापल्यानंतर त्यावरील साली काढून फेकून देतो. जर तुम्हीही असं करत असाल तर तुम्ही चूकीचे करत आहात. कसे काय? घ्या जाणून
आपण फळे व भाज्या कापल्यानंतर त्यावरील साली काढून फेकून देतो. जर तुम्हीही असं करत असाल तर तुम्ही चूकीचे करत आहात. डॉ. केली मॅकग्रेन यांनी हेल्थलाईन या संकेतस्थळाला दिलेल्या माहितीनुसार भाज्या व फळांच्या सालींमध्ये अनेक महत्वाचे घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे असतात. बऱ्याच सालींमध्ये कॉन्सट्रेटेड फायटौकॅल्शियम असते. अशा अनेक गुणधर्मांनी फळं समृद्ध असतात.
सफरचंदाची साल
सफरचंदात भरपूर प्रमाणात फायबर असते. यामध्ये पेक्टिन नामक असलेले फायबर शरीरातील वाईट कॉलेस्ट्ऱॉल कमी करते. तसेच रक्तातील साखरही नियंत्रणात ठेवते. यात असलेले अँटीऑक्सिडंट्स कॅन्सरच्या पेशी वाढण्याची प्रक्रिया थांबवतात.
बटाट्याची साल
बटाट्याच्या सालीत मोठ्या प्रमाणावर झिंक, व्हिटामिन सी, आयरन, पोटॅशियम, व्हिटामिन बी असते. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यात अँटीऑक्सिडंट्सही असतात. तसेच यामुळे पचनक्रिया सुधारते.
केळ्याची साल
केळ्याच्या सालीच्या सेवनामुळे सेरोटोनिन नामक संप्रेरके स्त्रवतात. याला फील गुड हार्मोन असेही म्हटले जाते. ज्यामुळे तुम्ही आनंदी राहता. यात ल्युटिन नावाचे अँटीऑक्सिडंटही असते जे तुमच्या डोळ्याचे सुर्याच्या अल्ट्राव्हायलट किरणांपासून बचाव करते. तसेच यामुळे मोतीबिंदुचा धोकाही कमी होतो. तुम्ही केळ्याची साल पाण्यात उकळून त्याचे सेवन करू शकता.
भोपळ्याची साल
भोपळ्याच्या सालीत बीटा कैरोटीन असते जे कॅन्सरपासून आपला बचाव करते. यात झिंक असते ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.