टॉयलेटमध्ये फोन वापरत असाल तर अतिसार, क्षयरोग अन् मेंदूज्वराचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 07:40 AM2023-04-26T07:40:27+5:302023-04-26T07:40:47+5:30
हात धुण्याची सवय लावा, अन्यथा होतील आजार
लिसेस्टर : झोपताना, काम करताना, स्वयंपाक करताना, सफाई करताना, अभ्यास करताना, गाडी चालवतानाही सध्या मोबाइल वापराची सवय आपल्याला आहे. टॉयलेटमध्ये फोन वापरण्याचे प्रमाण ९० टक्के इतके वाढले आहे. त्यामुळे आपण टॉयलेटमधून बाहेर पडताना टॉयलेट सीटवर असलेल्या जीवाणू, विषाणूंपेक्षा अधिक विषाणू आपण मोबाइलवर घेऊन फिरतो. तोच मोबाइल आपण मुलांना देतो. यामुळे मोठ्या प्रमाणात आजार वाढण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.
औषधांना प्रतिसाद नाही
n संशोधनात असे आढळून आले आहे की फोनवरील अनेक रोगजंतू अनेकदा औषधांना प्रतिसाद देत नाहीत.
n याचा अर्थ पारंपरिक औषधांनी त्यांच्यावर उपचार करता येत नाहीत. हे चिंताजनक आहे. या जीवाणूंमुळे त्वचा, आतड्यांसंबंधी व श्वसन संक्रमण होऊ शकते जे जीवघेणे असू शकते.
आपण मुलांना खेळण्यासाठी फोन देतो. जेवतानाही आपण फोन वापरतो. फोनला सर्व प्रकारच्या (घाणेरड्या) पृष्ठभागावर ठेवतो. यामुळे तुमच्या फोनवर जंतू जमा होतात. दिवसातून शेकडोवेळा फोनला हात लावतो. त्यानंतर तोच हात कुठेही वापरतो. त्यामुळे आजारी पडण्याची भीती वाढली आहे.
- प्रिमरोज फ्रिस्टोन, संशोधक, क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी, लिसेस्टर विद्यापीठ
कोणते आजार होतात?
फोनवर ईकोलाय, स्टेफिलोकोकस, ऍक्टिनो बॅक्टेरिया असतात. यामुळे अतिसार (जुलाब), क्षयरोग आणि घटसर्प, मूत्रमार्गात गंभीर संक्रमण, मेंदूज्वर, क्लेबसिएला, मायक्रोकोकस, प्रोटीयस, स्यूडोमोनास व स्ट्रेप्टोकोकसही फोनवर आढळले असून, यामुळेही मानवांवर तितकेच वाईट परिणाम होऊ शकतात.
काय करावे लागेल?
n अल्कोहोल-आधारित वाइप्स किंवा स्प्रेने फोन स्वच्छ करा.
n फोन खिशात वा पिशवीत ठेवा, फोन शेअर करू नका
मुलांना सांभाळा
विषाणू फोनवर अनेक दिवस राहू शकतात. त्यामुळे मुलांना सांभाळण्याची गरज आहे.