चालाल तर वाचाल, रोज तीन मिनिटं चालण्याचे 'असे' फायदे जे तुमच्या कल्पनेच्या बाहेर आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 08:51 PM2021-06-27T20:51:09+5:302021-06-27T20:51:39+5:30
चालण्याचा व्यायाम स्नायू, सांधे आणि हाडे मजबूत करतो आणि चयापचय क्रिया वाढवण्यात मदत करतो. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, नियमितपणे अर्धा तास चालणे आवश्यक आहे.
चालणं ही एक शारीरिक क्रिया आहे. आणि याचे बरेच फायदे आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही आरोग्याची काळजी घेण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी ठरवून चालता तेव्हा चालण्यासारखा उत्तम व्यायाम नाही. चालण्याचा व्यायाम स्नायू, सांधे आणि हाडे मजबूत करतो आणि चयापचय क्रिया वाढवण्यात मदत करतो. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, नियमितपणे अर्धा तास चालणे आवश्यक आहे.
उर्जावान वाटते
काही काळ पायी चालण्याने तुम्ही उर्जेला चालना देऊ शकता. चालण्यामुळे, शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढते, ज्यामुळे नॉरेपाइनफ्रिन आणि एपिनेफ्रिन यांसारख्या हार्मोन्सची पातळी वाढते.
मसल्स आणि जॉइंट्स मजबूत होतात
नियमित चालण्यामुळे शरीराच्या खालच्या भागातील स्नायूंना बळकटी मिळते. गुडघे तसंत कंबरेच्या स्नायूंना बळकट करण्यासोबतच सांधेही मजबूत करण्यासाठी काम करतं. सपाट पृष्ठभागावर चालण्याऐवजी, किंचित उंच भागात चालणं फायदेशीर ठरेल.
हृदयाचं आरोग्य वाढते
पायी चालण्याने तुमच्या हृदयाचं आरोग्य उत्तम तर राहतेच पण हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोकाही कमी होतो. यासाठी, आठवड्यातून ५ दिवस कमीत कमी ३० मिनिटं चालणं आवश्यक आहे. तुम्हाला ही क्रिया नियमितपणे करण्याची आवश्यकता आहे.
ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत
आपल्याला नेहमी सल्ला देण्यात येतो की जेवण झाल्यावर झोपू नये. त्याऐवजी काही वेळ चाललं पाहिजे. खाल्ल्यानंतर पायी चालण्याने शरीरातील साखरेची पातळी कमी होते. हा एक चांगला व्यायाम आहे आणि जो आपण आपल्या दैनंदिन कामात तुम्ही समाविष्ट करू शकता.
कॅलरी बर्न होतात
कॅलरी बर्न करण्यासाठी केवळ हेवी वर्कआउट्स आणि व्यायाम करावाच लागतो असं नाही. ते केल तर उत्तमच पण तुम्ही चालण्यानेही कॅलरी बर्न करू शकता. किती वजन कमी करायचं आहे आणि तुम्ही किती वेगाने तसचं किती दिवस चालत आहात यावर अवलंबून आहे.