जर दुष्परिणाम टाळायचे असतील तर, कधीही पुन्हा गरम करू नका 'हे' पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 09:43 PM2021-06-14T21:43:47+5:302021-06-14T21:44:34+5:30

आपण बरेचदा राहिलेले पदार्थ फ्रीजमध्ये साठवून ठेवतो आणि परत गरम करतो. पण तुम्हाला माहितीही नसेल की, काही पदार्थ असे आहेत, जे पुन्हा गरम करून खाल्ल्याने आपल्या आरोग्यास त्याचे धोके संभवतात.

If you want to avoid side effects, never reheat 'this' food | जर दुष्परिणाम टाळायचे असतील तर, कधीही पुन्हा गरम करू नका 'हे' पदार्थ

जर दुष्परिणाम टाळायचे असतील तर, कधीही पुन्हा गरम करू नका 'हे' पदार्थ

googlenewsNext

आपण बरेचदा राहिलेले पदार्थ फ्रीजमध्ये साठवून ठेवतो आणि परत गरम करतो. पण तुम्हाला माहितीही नसेल की, काही पदार्थ असे आहेत, जे पुन्हा गरम करून खाल्ल्याने आपल्या आरोग्यास त्याचे धोके संभवतात. तसेच हे पदार्थ खाल्ल्याने अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते. आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही पुन्हा गरम करून खाणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

भात:
बरेच लोक रात्रीचा उरलेला भात पुन्हा गरम करून खातात. मात्रस फूड्स स्टँडर्ड एजन्सी(एफएसए)नुसार शिळा भात पुन्हा गरम केल्याने त्या व्यक्तीला फूड पॉईझनिंगची होऊ शकते. भात शिजवताना बॅसिलस सेरेस हे बॅक्टेरिया नष्ट होतात मात्र भात थंड होतात पुन्हा जिवंत होतात. त्यामुळे भात पुन्हा गरम केल्यास त्या व्यक्तीला फूड पॉईजनिंग होऊ शकते.

बीट:
बीटही एकदा शिजवल्यानंतर पुन्हा गरम करू नये. असे केल्याने त्यातील नायट्रेट संपून जातात.


मशरूम:
मशरूमची भाजी बनवल्यानंतर ती लगेचच खावी. दुसऱ्या दिवसासाठी ठेवू नये. मशरूम प्रोटीनचा चांगला स्त्रोत मानला जातो. तसेच त्यात खनिजेही असतात. मात्र जेव्हा ही भाजी तुम्ही पुन्हा गरम करता तेव्हा यातील प्रोटीन्स नष्ट होतात. तसेच त्यात विषारी पदार्थ तयार होतात.

बटाट्याची भाजी:
बटाट्याची भाजी प्रत्येकाला आवडत असते. मात्र ही भाजी पुन्हा गरम करून कधीच खाऊ नका. बटाट्यामध्ये व्हिटामिन बी६, पोटॅशियम आणि व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात असते. ही भाजी जेव्हा पुन्हा गरम केली जाते तेव्हा त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. तसेच बटाट्याची भाजी वारंवार गरम केल्यास यात क्लोस्ट्रीडियम बोटुलिनम नावाचे बॅक्टेरिया तयार होतात.  

पालक:
पालक अथवा हिरव्या भाज्या , गाजर, ओवा यामध्ये नायट्रेट मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे मायक्रोव्हेवमध्ये ते गरम केल्यास त्यातील नायट्रोजन नायट्राईट आणि त्यानंतर नायट्रोजमीन्समध्ये बदलतात. ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

Web Title: If you want to avoid side effects, never reheat 'this' food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.