परफेक्ट पर्सनॅलिटी आणि बॉडीसाठी विकी कौशलच्या वर्कआउट टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 05:33 PM2019-03-06T17:33:35+5:302019-03-06T17:34:40+5:30

'मसान', 'मनमर्जिया' आणि त्यानंतर 'उरी' या ब्लॉकबास्टर चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने लोकांना प्रभावित करणारा अभिनेता विकी कौशल सध्या अवघ्या तरूणाईचा युथ आयकॉन बनला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

If you want to get a fit body follow these workout tips from actor vicky kaushal | परफेक्ट पर्सनॅलिटी आणि बॉडीसाठी विकी कौशलच्या वर्कआउट टिप्स

परफेक्ट पर्सनॅलिटी आणि बॉडीसाठी विकी कौशलच्या वर्कआउट टिप्स

Next

'मसान', 'मनमर्जिया' आणि त्यानंतर 'उरी' या ब्लॉकबास्टर चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने लोकांना प्रभावित करणारा अभिनेता विकी कौशल सध्या अवघ्या तरूणाईचा युथ आयकॉन बनला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. उरीमधील 'हाऊ द जोश' हा डायलॉग विकीच्या रिअल लाइफमध्येही लागू होत असल्याचे दिसून येते. कारण विकी नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असतो. त्याच्या दमदार अभिनयासोबतच त्याच्या पिळदार शरिरयष्टीसाठीही तो ओळखला जाऊ लागला आहे. विकी आपल्या बेस्ट अ‍ॅक्टिंगसोबतच आपली पर्सनॅलिटी आणि परफेक्ट बॉडिसाठी फार मेहनत घेत असतो. विकी त्यासाठी तासन्तास जिममध्ये असण्यासोबतच हेव्ही वर्कआउट आणि फिटनेस शेड्यूलवरही लक्षं देतो. 

वर्कआउट करण्याचा उद्देश

विकी कौशल वर्कआउट फक्त मसल्स, चेस्ट आणि अ‍ॅब्ज तयार करण्यासाठी करत नाही. त्याच्या वर्कआउटचा उद्देश असतो की, तो संपूर्ण शरीरावर लक्ष केंद्रित करू शकेल. इन्स्टाग्रामवर त्याचे फॉलोअर्स त्याला प्रत्येक तासाला वर्कआउट करताना पाहत असतात. 

जाणून घ्या त्याचं फिटनेस शेड्यूल

विकी आपले स्नायू बळकट करण्यासाठी वेगवेगळे वर्कआउट करत असतो. पुलअप्स करतानाचे त्याचे अनेक व्हिडीओ तुम्हीही पाहिले असतील. हे एक स्ट्रेन्थ ट्रेनिंगचं रूप आहे. पुलअप्स एक संयुक्त व्यायामाचा प्रकार आहे. ज्यामध्ये मनगट, कोपर, खांदे आणि बायसेप्स या सर्वांचा उपयोग होतो. एवढचं नाही तर भविष्यात सतावणाऱ्या पाठीच्या दुखण्यापासून बचाव करायचा असेल तर पुलअप्स मदत करतात. 

कार्डियोसाठी ट्रेडमिलवर धावणं बेस्ट

बेस्ट कार्डियो एक्सरसाइजसाठी तो ट्रेडमिलवर धावतो. धावण्याआदी तो वार्मिंक किंवा स्ट्रेचिंग करतो. पळणं आरोग्य उत्तम राखण्यासोबतच हृदयासाठीही फायदेशीर ठरतं. व्यायम करण्याचं हा सर्वात उत्तम आणि सोपा पर्याय आहे. अनेक संशोधनांमधूनही ट्रेडमिलवर धावल्याने स्ट्रोक, कॅन्सर आणि मधुमेह यांसारखे आजार दूर होतात. हाडं कमजोर होऊ नयेत म्हणून पळणं गरजेचं असतं. 

बॅटल रोप

बॅटल रोप ट्रेनिंगचा अभ्यासही विकी कौशलच्या वर्कआउटपैकी एक आहे. या ट्रेनिंगमध्ये ताकदीची आणि मजबूत पकडीची गरज असते. याचा अभ्यास केल्याने खांदे, स्नायू, ग्रिप, पाय आणि टाचांचं आरोग्य उत्तम राहतं. 

पाहूयात विकी कौशलचे डॅशिंग लूक :

Web Title: If you want to get a fit body follow these workout tips from actor vicky kaushal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.