आरोग्य आणि फॅशन दोन्ही एकाचवेळेस जपायचं असेल तर आॅर्गेनिक व्हा आणि आॅर्गेनिक कपडे वापरा.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2017 07:49 PM2017-07-05T19:49:52+5:302017-07-05T19:51:15+5:30
अलिकडे फॅशन इंडस्ट्रीनं आॅर्गेनिक क्लोदींग ही एकप्रकारची चळवळ सुरू करून या नैसर्गिक कपड्यांना एक नवा आयाम दिला आहे.
- मोहिनी घारपुरे-देशमुख
आपल्याकडे ‘आॅर्गेनिक क्लोदिंग’ ही टर्म काही नवीन नाही. सुती कपडे, खादी आणि नैसर्गिक कापडांचा वापर आपल्याकडे फार वर्षांपूर्वीपासून होतो आहे. परंतु अलिकडे फॅशन इंडस्ट्रीनं मात्र आॅर्गेनिक क्लोदींग ही एकप्रकारची चळवळ सुरू करून या नैसर्गिक कपड्यांना एक नवा आयाम दिला आहे. फॅशन जगतातील नामांकित ब्रँण्डसनी अलिकडे नैसर्गिक कापड आणि नैसर्गिक रंग यांचा वापर करून डिझायनर कपड्यांची निर्मिती करणं सुरू केलं आहे.
यामध्ये विशेषत: सती, ज्यूट, सिल्क, रेशमी आणि लोकरीच्या कापडाचा उपयोग केला जातो. या कपड्यांची किंमत फार जास्त असते कारण हे कपडे नैसर्गिकरित्या तयार करण्यात आलेल्या कापडापासून बनवलेले असतात. मात्र असे असले तरी अनेक ब्रॅण्डस संपूर्णत: आॅर्गेनिक कपडे तयार करण्याऐवजी आॅर्गेनिक आणि नॉन आॅर्गेनिक अशा दोन्हीही प्रकारच्या कपड्यांचा (रंग किंवा धागे अशा अर्थानं) वापर करून मग तऱ्हेतऱ्हेचे फॅशनेबल कपडे बनवतात आणि बाजारात विकतात.
जगभरातले आॅर्र्गॅनिक क्लोदींगचे आघाडीचे ब्रॅण्ड्स
1.शिफ्ट टू नेचर
2.पॅक्ट
3.थॉट
4.ब्यूमॉन्ट आॅर्गेनिक
5.बिबीको
6.नोक्टू
7.कलर्ड आॅर्गेनिक्स
8.कुयिची
9.ब्रूक देअर
10.लूमस्टेट
आॅर्गेनिक क्लोदींगमधील भारतातील आघाडीचे ब्रँण्ड्स
1.इंडीग्रीन
2.नो नॅस्टीज
3.फोर्टी रेड बँगल्स
4.सॅमतना
5.त्वच (त्वचा नाही)
6.अनोखी
7.यूव्ही अँड डब्ल्यू
8.भू सत्त्व
9.डू यू स्पीक ग्रीन
10.एथिकस