वजन कमी करणाऱ्या प्रत्येकांनी फॉलो कराव्या डॉक्टर श्रीराम नेने यांच्या 'या' खास टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 09:52 AM2024-06-11T09:52:10+5:302024-06-11T09:54:46+5:30

Dr. Nene Wight Loss Tips : डॉक्टर नेने हे इन्स्टावर अनेक वेगवेगळ्या सोशल मीडियावर आरोग्य कसं चांगलं ठेवता येईल याबाबत टिप्स देत असतात.

If you want to lose weight, follow Dr. Shriram Nene's special tips! | वजन कमी करणाऱ्या प्रत्येकांनी फॉलो कराव्या डॉक्टर श्रीराम नेने यांच्या 'या' खास टिप्स!

वजन कमी करणाऱ्या प्रत्येकांनी फॉलो कराव्या डॉक्टर श्रीराम नेने यांच्या 'या' खास टिप्स!

Dr. Nene Wight Loss Tips : धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे पती डॉक्टर श्रीराम नेने हे सोशल मीडियावर चांगलेच अ‍ॅक्टिव असतात. ते सोशल मीडियावर माधुरीसोबत वेगवेगळ्या रेसिपी सांगत असतात तर कधी फिटनेस टिप्स देत असतात. असाच एक व्हिडीओ त्यांनी काही दिवसांआधी पोस्ट केला होता. ज्यात डॉ. नेने यांनी वजन करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याबाबत सांगितलं होतं. तेच आज आपण जाणून घेणार आहोत. 

डॉक्टर नेने हे इन्स्टावर अनेक वेगवेगळ्या सोशल मीडियावर आऱोग्य कसं चांगलं ठेवता येईल याबाबत टिप्स देत असतात. त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरलही होतात. असाच एक व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला होता. 

पहिली स्टेप

डॉ. नेने यांनी सांगितलं की, "परिणामकारक आणि हेल्दी पद्धतीने तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सगळ्यांनी आधी आपल्या डाएटबाबत खूप काळजी घेतली पाहिजे. कारण वजन कमी करण्याचा जेव्हा विषय निघतो तेव्हा सगळ्यात आधी डोळ्यांसमोर आपला आहार येत असतो".

दुसरी स्टेप

दुसऱ्या स्टेपमध्ये ते म्हणाले की, "जास्त वजन असलेल्या लोकांनी वजन कमी करायला लागण्याआधी सध्याचं त्यांचं वजन, ते काय खातात, फिजिकल अ‍ॅक्टिविटी काय करतात हे सगळं एका कागदावर लिहून काढलं पाहिजे. जेणेकरून या गोष्टींवर तुम्हाला फोकस होऊन काम करता येईल".

तिसरी स्टेप

अशाप्रकारे गोष्टी लिहून काढल्या तर काय होईल याबाबत ते म्हणाले की, "डाएट एक्सरसाइज आणि इतर बदललेल्या सवयींमुळे असं होईल की, जेव्हा पुढे कधी तुमचं वजन कमी होईल आणि तुम्हाला स्वत:मध्ये बदल दिसेल तेव्हा तुम्हाला या गोष्टी बघून प्रेरणा मिळेल".

डाएट

ते म्हणाले की, "तुमच्यातील लठ्ठपणा वाढण्यासाठी 80 टक्के तुमची डाएट जबाबदार असते. तुम्ही ज्या खाता त्या गोष्टी जबाबदार असतात. त्यामुळे जेव्हाही वजन कमी करण्याचा विचार कराल तेव्हा डाएटवर फोकस करा".

एक्सरसाइज

"तुम्ही जे काही खात आहात त्यातील पोषक तत्व अवशोषित होण्यासाठी तुम्हाला शारीरिक हालचाल करावी लागेल. यासाठी तुम्ही एक्सरसाइज करा, योगा करा किंवा चालायला सुरू करा".

जबरदस्ती नको

त्यांनी सांगितलं की, "वजन कमी करत असताना काही नियम हवेत, पण त फार कठोरही नकोत. कारण असे नियम जास्त दिवस फॉलो केले जात नाहीत. खाण्या-पिण्यावरही कठोर नियम नको. त्याऐवजी भरपूर पाणी प्या, रोज थोडावेळ एक्सरसाइज करा आणि निरोगी रहा".
 

Web Title: If you want to lose weight, follow Dr. Shriram Nene's special tips!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.