तुम्ही वापरत असलेल्या मीठात प्लॅस्टिक तर नाही ना? वेळीच सावध व्हा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 04:27 PM2018-09-04T16:27:48+5:302018-09-04T16:29:36+5:30
आपल्या देशांत मिळणाऱ्या अनेक मोठ्या मोठ्या ब्रँडच्या मीठामध्ये प्लॅस्टिकचा अंश आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आपल्या देशांत मिळणाऱ्या अनेक मोठ्या मोठ्या ब्रँडच्या मीठामध्ये प्लॅस्टिकचा अंश आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. IIT बॉम्बेच्या एका रिसर्चमधून असा खुलासा करण्यात आला आहे की, मायक्रोप्लास्टिकच्या छोट्या छोट्या कणांमध्ये मीठ मिक्स करण्यात येतं. पाच मिलीमीटरपेक्षा कमी आकाराच्या या कणांना मीठामधून शोधून काढणं फार अशक्य असतं. परंतु रिसर्चमधून असा खुलासा करण्यात आला की, मीठामध्ये प्लास्टिक असण्याची शक्यता आधिक आहे.
आयआयटी-मुंबईच्या सेंटर फॉर एनवायर्नमेंट सायन्स अॅन्ड इंजीनिअरिंगच्या एका टिमने काही नमुने तपासून पाहिले. ज्यामध्ये मायक्रो-प्लास्टिकचे 626कण आढळून आले. मीठासोबत मिसळलेल्या या कणांमध्ये 63 टक्के कम फारच छोट्या तुकड्यांमध्ये आढळून आले. तसेच इतर 37 टक्के कण हे फायबर स्वरूपात आढळून आले.
या रिसर्चमधून समोर आलेल्या तथ्यांच्या आधारे एक किलो मीठामध्ये 63.76 मायक्रोग्राम मायक्रोप्लास्टिक आढळून आलं आहे. यातून असं अनुमान लावण्यात येत आहे की, एखादी व्यक्ती प्रत्येक दिवशी 5 ग्रॅम मीठ वापरत असेल तर एका वर्षात एक भारतीय 117 मायक्रोग्रॅम मीठाचं सेवन करतं.
मीठातून असाप्रकारे प्लॅस्टिकचा अंश आपल्या पोटात जातो. त्यामुले अनेक लोकांना गंभीर आजारांना सामोरं जावं लागतं.