Wearable air purifier: आता मास्क विसरा! वापरा नाकात घालण्यायोग्य एअर प्युरिफायर, N95 इतकाच सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 06:19 PM2022-02-27T18:19:08+5:302022-02-27T18:23:38+5:30

IIT दिल्लीच्या स्टार्ट-अप Nanoclean ने आज Naso-95 (Naso-95) लाँच केला आहे. विशेष म्हणजे हा जगातील सर्वात लहान वेअरेबल एअर प्युरिफायर (Wearable Air Purifier) आहे.

IIT Delhi launches world smallest wearable purifier naso 95 | Wearable air purifier: आता मास्क विसरा! वापरा नाकात घालण्यायोग्य एअर प्युरिफायर, N95 इतकाच सुरक्षित

Wearable air purifier: आता मास्क विसरा! वापरा नाकात घालण्यायोग्य एअर प्युरिफायर, N95 इतकाच सुरक्षित

googlenewsNext

कोरोना महामारीमुळे फेस मास्कचा (Face Mask) सर्वाधिक वापर केला जात आहे. परंतु, आता आयआयटी दिल्लीने (IIT Delhi) मास्कच्या एक पाऊल पुढं टाकलं आहे आणि एक एअर प्युरिफायर (Air Purifier) लॉन्च केला असून तो खूपच लहान आहे. हा थेट नाकात लावता येतो आणि त्यामुळे शुद्ध श्वासासोबतच कोरोनासारखे विषाणूही टाळता येतात. IIT दिल्लीच्या स्टार्ट-अप Nanoclean ने आज Naso-95 (Naso-95) लाँच केला आहे. विशेष म्हणजे हा जगातील सर्वात लहान वेअरेबल एअर प्युरिफायर (Wearable Air Purifier) आहे.

नॅनोक्लीन ग्लोबल, आयआयटी दिल्लीच्या स्टार्ट-अपने बनवलेला हा एअर प्युरिफायर N95 ग्रेड फेस मास्कसारखा प्रभावी आहे. आयआयटी दिल्लीतील डॉक्टर आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा लॉन्च करण्यात आला. Naso 95 हे N-95 ग्रेडचे नाकपुड्यांचा फिल्टर आहे. हा वापरणाऱ्याच्या नाकाला चिकटून राहतो आणि बॅक्टेरिया, विषाणू, परागकण आणि कसलंही वायू प्रदूषण श्वासातून फुफ्फुसात जाण्यास प्रतिबंधित करतं. कोरोना सारख्या विषाणूंवरही हा N-95 ग्रेड फेस मास्कइतकाच प्रभावी आहे. 5 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले देखील हा एअर प्युरिफायर वापरू शकतात.

Naniclone द्वारे सांगण्यात आले की, Naso-95 हा एअर प्युरिफायर सामान्य फेसमास्क किंवा लूज फिटिंग फेस मास्कपेक्षा सुरक्षित आहे. या उत्पादनाची सुरक्षितता आणि परिणामकारकता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळांनी तपासली आहे. उत्पादन वेगवेगळ्या आकारात देखील उपलब्ध असेल – लहान, मध्यम, मोठे आणि लहान मुलांसाठी.

NASO-95 लाँच प्रसंगी उपस्थित असलेले दिल्ली AIIMS चे माजी संचालक डॉ एम सी मिश्रा म्हणाले की, वायू प्रदूषण ही आज विषाणूपेक्षाही मोठी समस्या आहे. फुफ्फुसाचा कर्करोग आज सामान्य झाला आहे. अशा परिस्थितीत, Naso 95 सारखी उत्पादने श्वासोच्छवासाचे आजार आणि महानगरांमधील या समस्यांशी लढण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतात. महामारीच्या काळात हे उत्पादन अधिक उपयुक्त ठरू शकते. विशेषत: जेव्हा तुम्हाला विमानतळावर ओळख, सुरक्षा तपासणी इत्यादीसाठी तुमचा मास्क काढावा लागतो.

त्याच वेळी, भारत सरकारच्या तांत्रिक विकास मंडळाचे सचिव राजेश कुमार पाठक यांनी सांगितले की, त्यांनी NASO 95 देखील वापरून पाहिला. हा वापरण्यास अतिशय सोपा आणि आरामदायक आहे. हे उत्पादन समाजासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते आणि सर्व वयोगटातील लोक ते वापरू शकतात. यासोबतच हे उत्पादन सर्वसामान्यांपर्यंत नेण्यासाठी तंत्रज्ञान विकास मंडळ स्टार्ट अप्सना पूर्ण सहकार्य करेल.

नॅनोक्लीन ग्लोबलचे संचालक सीईओ प्रतीक शर्मा म्हणाले की, महामारीच्या गेल्या दोन वर्षांत जगभरातील लोकांच्या वागणुकीत बदल झाला आहे. लोक नकळत मास्क उतरवल्याचे अनेकदा दिसून आले आहे. ACE2, TMPRSS2 सारखे संक्रमण नाकातून सहज आत जातात. परंतु, फेस मास्कच्या तुलनेत लोकांना Naso 95 च्या वापराने त्रास होणार नाही. मास्क वापरण्याच्या कटकटीपेक्षा हा एक सोयीस्कर पर्याय आहे. त्याच वेळी, डॉ. अनिल वली, एमडी, FITT IIT दिल्ली, डॉ. विमल के सिंग निओनॅटोलॉजिस्ट, MBBS, मौलाना आझाद, आशुतोष पास्टर, FITT IIT दिल्ली यांनी देखील Naso 95 चांगला असल्याचे म्हटले.

Web Title: IIT Delhi launches world smallest wearable purifier naso 95

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.