अरे व्वा! IIT तज्ज्ञांनी तयार केला अनोखा टी-शर्ट; संपर्कात येताच कोरोना व्हायरस नष्ट होणार
By Manali.bagul | Published: October 4, 2020 09:48 AM2020-10-04T09:48:15+5:302020-10-04T10:02:58+5:30
CoronaVirus News & Latest updates : दरम्यान कोरोनाचं सक्रमण रोखण्याबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे. आयआयटी दिल्लीतील दोन कंपन्यांनी कोरोना व्हायरसपासून बचाव होण्यासाठी एंटी व्हायरल किट तयार केलं आहे.
जगभरात कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचे रुग्ण वाढत आहे. अनेक देशातील शास्त्रज्ञ लस आणि औषधं शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. चीन, रशिया, भारत आणि अमेरिका या देशात लसीच्या चाचणीचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. याशिवाय कोरोनाच्या माहामारीला रोखण्यासाठी इतर उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान कोरोनाचं सक्रमण रोखण्याबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे. आयआयटी दिल्लीतील दोन कंपन्यांनी कोरोना व्हायरसपासून बचाव होण्यासाठी एंटी व्हायरल किट तयार केलं आहे. यात एक सॅनिटायजर, मास्क आणि लोशन, टी शर्ट यांचा समावेश आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार या टी शर्टच्या संपर्कात आल्यास कोरोना व्हायरस नष्ट होऊ शकतो.
या टी शर्टबाबत आयआयटीने केलेल्या दाव्यानुसार हा एक खास टीशर्ट असून या टी शर्टच्या संपर्कात आल्यानंतर कोरोना व्हायरस नष्ट होईल. आयआयटीचे प्राध्यापक विपिन कुमार यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून व्हायरसविरोधी कपडे तयार करण्यासाठी प्रयत्न सरू होते. दीर्घ संशोधनानंतर एंटी व्हायरल किट हे नाव देण्यात आलं आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या टी शर्टवर वेगवेगळ्या प्रकारच्या रसायनांचे कोटिंग करण्यात आले होते. कोणताही व्हायरस या कपड्यांच्या संपर्कात आल्यानंतर निष्क्रीय होऊ शकतो. विशेष म्हणजे या रसायनांमुळे शरीरावर कोणताही वाईट परिणाम दिसून येणार नाही.
प्राध्यापक कुमार यांनी सांगितले की, ३० वेळा धुवून या टी शर्टचा वापर केला जाऊ शकतो. वापराच्यावेळी हे टी शर्ट ९५ टक्के व्हायरसविरोधी असेल. संपर्कात असलेल्या ९५ टक्के व्हायरसला निष्क्रीय करण्यास प्रभावी ठरेल. सध्या स्मॉल(S), मीडियम(M) आणि लार्ज(L) साइजमध्ये टी शर्ट्स उपलब्ध आहेत. मागणी वाढल्यास महिला आणि लहान मुलांसाठीही उत्पादन सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान आयआयटीमध्ये काही महिन्यांआधी चहा आणि हर्डा यांचा वापर कोरोनाशी लढण्यासाठी कसा करता येईल याबाबत संशोधन केले होते. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही या संशोधनाची स्तुती केली होती.
पाठीच्या कण्याच्या त्रासाकडे दुर्लक्ष केल्यास होऊ शकतात 'असे' भयंकर परिणाम, वेळीच सावध व्हा
दरम्यान भारतात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. या धोकादायक विषाणूची लागण आतापर्यंत ६३ लाखाहून अधिक लोकांना झाली आहे, तर मृतांची संख्या एक लाखांवर पोहोचली आहे. वाढता संसर्ग लक्षात घेता, देशातील शास्त्रज्ञ वेगाने संशोधन आणि अभ्यास करीत आहेत. याच अनुक्रमे, सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की देशातील केवळ आठ टक्के कोरोना रूग्णच सुपर स्प्रेडर्स बनून ६० टक्के लोकांना संक्रमित करत आहेत.
CoronaVirus News : कोरोना फुफ्फुसाला बनवतोय दगड, अहमदाबादमधील डॉक्टरांचा दावा