अजून यौवनात मी! तरुण दिसण्यासाठी काय पण....! 

By संतोष आंधळे | Published: May 21, 2023 01:18 PM2023-05-21T13:18:56+5:302023-05-21T13:19:18+5:30

काही वर्षांपूर्वी सौंदर्य खुलविणे किंवा तरुण दिसण्यासाठी विविध गोष्टींचा अवलंब करणे म्हणजे चैन मानली जायची. मात्र, आता सहजपणे ग्रामीण भागातील पुरुष-महिलांपासून शहरातील मध्यमवर्गीय नागरिक सुंदर दिसावे, म्हणून प्रयत्न करताना दिसत आहेत.

I'm still young! What to look young....! | अजून यौवनात मी! तरुण दिसण्यासाठी काय पण....! 

अजून यौवनात मी! तरुण दिसण्यासाठी काय पण....! 

googlenewsNext

संतोष आंधळे, विशेष प्रतिनिधी

गेल्या काही वर्षांत आरोग्य चांगले ठेवण्यासोबत लोकांना भुरळ पडली आहेत ती म्हणजे 'तरुण' दिसण्याची. कुठल्याही माध्यमांवर पाहिले तर 'तरुण दिसण्यासाठी हे उपाय करा...' या जाहिराती मोठ्या प्रमाणात आढळून येतात.

सर्वसाधारणपणे वयाच्या चाळिशीनंतर तरुण दिसण्याच्या हट्टाला सुरुवात होते. कारण, या २ वयात चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, शरीरातील चरबीचे प्रमाण वाढून लठ्ठपणाकडे वाटचाल सुरू झालेली असते. त्याशिवाय केस गळायला सुरुवात झालेली असते. डोळ्यांच्या खालच्या भागावर काळ्या रंगाचे वर्तुळ येण्याची प्रक्रिया ३ सुरू झालेली असते. आधुनिक जीवनशैलीमुळे साठीचे आजार असणारे मधुमेह आणि उच्च रक्तदाब चाळिशीत दिसू लागले आहेत. यासाठी कॉस्मेटिक सर्जन, डर्माटॉलॉजिस्ट यांच्या भेटी घेतल्या जात आहेत. स्लिम ट्रिम क्लिनिकच्या अपॉइंटमेंटमध्ये वाढ झाली आहे. एकंदरच, नागरिकांनी फिट कसे राहावे, यासाठी असणाऱ्या रिल्सचे लाखो फॉलोवर आपल्याला आढळून येतात. हा सगळा आटापिटा सुरू आहे तो तंदुरुस्त राहण्यासाठी.

काही वर्षांपूर्वी सौंदर्य खुलविणे किंवा तरुण दिसण्यासाठी विविध गोष्टींचा अवलंब करणे म्हणजे चैन मानली जायची. श्रीमंत लोकांची ती मोनोपॉली होती. मात्र, आता सहजपणे ग्रामीण भागातील पुरुष-महिलांपासून शहरातील मध्यमवर्गीय नागरिक आपण सुंदर दिसावे म्हणून प्रयत्न करताना दिसत आहेत. भारतात सौंदर्य प्रसाधनांची मोठी बाजारपेठ आहे. परदेशी ब्रँडपासून ते देशातील विविध स्किन केअरमधील ब्रेडमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.

असा ठेवला जातो चेहऱ्यावर जिवंतपणा
 डोळ्यांच्या खाली, गालावर, हनुवटीच्या आसपास । आणि मानेवर वय वाढल्याच्या खुणा किंवा सुरकुत्या पडू लागतात. त्या दूर करण्यासाठी बोटॉक्सचा वापर मुख्यत्वे केला जातो. यामुळे चेहऱ्यावर जिवंतपणा येतो.
पोटाच्या आजूबाजूची चरबी कमी करण्यासाठी • लायपोसक्शन केले जाते. हार्मोन्सच्या गोळ्या, इंजेक्शनचा वापर तरुण दिसण्यासाठी केला जातो. लठ्ठपणा दूर करण्यासाठी गॅस्ट्रिक बायपास आणि स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमीसारख्या शस्त्रक्रिया केल्या जातात.
स्तन लहान किंवा मोठे करण्यासाठी • ब्रेस्ट रिडक्शन किंवा एन्हान्समेंटच्या शस्त्रकिया केल्या जातात. अँटी एजिंग आणि वजन कमी करण्यासाठी विविध गोळ्या बाजारात उपलब्ध आहेत.
केस गळाल्यावर हेअर ट्रान्सप्लांट केले जाते. प्लास्टिक सर्जरीद्वारे नाक छोटे करणे, हनुवटी व्यवस्थित करणे, गालावर डिम्पल्स तयार करण्यासाठी शस्त्रकिया करून घेतात. तसेच विविध व्हिटॅमिन्सच्या गोळ्या, पावडर यासुद्धा दिल्या जातात.

मोठ्या प्रमाणात फसवणूक
तरुण दिसण्यासाठी लाखो उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. अनेक उत्पादने विविध सौंदर्य टिकवून ठेवण्याचे अजब दावे करून ग्राहकांच्या माथी महागडी औषधे मारतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिराती करतात. मात्र, यामध्ये काहींची फसवणूक झाल्याच्या घटनासुद्धा घडल्या आहेत. तसेच सौंदर्य खुलविण्याच्या नादात काही शस्त्रक्रियांमुळे नागरिकांना त्रास झाला आहे. काही वेळा हा प्रकार जीवघेणा ठरु शकतो. त्यामुळे योग्य वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच शस्त्रक्रिया कराव्यात.


जुन्या काळातील घरगुती क्लृप्त्या

  • आंबा हळद लावणे, केसांसाठी रिठा शिकाकाई
  • मुलतानी माती आणि गुलाबपाण्याचे मिश्रण चेहयावर लावणे हळदीचे दूध पिणे
  • बेसनाचे पीठ, हळद आणि दुधावरील साय याचे मिश्रण चेहऱ्यावर लावणे
  • डार्क सर्कल जाण्यासाठी त्यावर बटाटा काप ठेवणे
  • काकडी डोळ्यांवर ठेवणे मध, लिबू व ग्लिसरीन मिश्रण लावणे
     

सध्याच्या काळात पुर्ण शरीर हे चेहऱ्याप्रमाणे सुंदर असावे, असे लोकांना वाटते. गेली ३० वर्षे मी सौंदर्यशास्त्रात काम करत आहे, माझ्याकडे वय वर्ष २० पासून ते ८० वर्षांपर्यंतचे पुरुष आणि महिला सौंदर्यावरील उपचार घेण्यासाठी येतात. बोटॉक्स शॉट घेणे, चेहयावरील एखादे व्यंग दूर करण्यापासून ते शरीरावरील अतिरिक्त केस काढण्याच्या लेझर उपचार घेण्यासाठी नागरिक येत असतात. वय वाढल्यानंतरही तरुण राहता येणे शक्य असल्याचे वैद्यकीय शास्त्राने दाखवून दिले आहे. पिगमेंटेशन पिपल्स आणि एजिंग या मुख्य समस्या दूर करण्यासाठी लोक वैद्यकीय शास्त्राचा वापर करून घेताना दिसत आहेत.
- डॉ. जमुना पै, सीनिअर कॉस्मेटोलॉजिस्ट
 

Web Title: I'm still young! What to look young....!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य