आयुर्वेदाने कोरोनावर उपचार होतात? इंडियन मेडिकल असोसिएशनने सरकारकडून मागितला पुरावा

By manali.bagul | Published: October 9, 2020 02:19 PM2020-10-09T14:19:15+5:302020-10-09T14:22:25+5:30

CoronaVirus News & Latest upadtes : आयएमएने केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना आयुष आणि योगा यांवर आधारीत कोरोना संबंधीत  प्रोटोकॉल्सबाबत पुराव्याबाबत विचारणा केली आहे. 

Ima asks health minister to produce proof on ayush yoga based treatment of covid | आयुर्वेदाने कोरोनावर उपचार होतात? इंडियन मेडिकल असोसिएशनने सरकारकडून मागितला पुरावा

आयुर्वेदाने कोरोनावर उपचार होतात? इंडियन मेडिकल असोसिएशनने सरकारकडून मागितला पुरावा

Next

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ६ ऑक्टोबरला कोरोना व्हायरसच्या उपचारांसाठी आयर्वेद आणि योग यांवर आधारित प्रोटोकॉल्स  देण्यात आले होते.  दरम्यान आरोग्य मंत्रालयाच्या या दाव्याबाबत (आयएमए) इंडियन मेडिकल असोसिएशन  नाखुश असल्याचे दिसून येत आहे. आयएमएने केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना आयुष आणि योगा यांवर आधारीत कोरोनाविषयी  प्रोटोकॉल्सच्या पुराव्यांबाबत विचारणा केली आहे. आयएमएने कोरोनाच्या लक्षण नसलेल्या आणि सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना आयुष आणि योगाच्या साहाय्याने बरं होता येऊ शकतं. या मुद्द्यावरून डॉ. हर्षवर्धन यांना वेगवेगळे प्रश्न विचारले आहेत.

आयएमएने निवेदनात दिलेल्या माहितीनुसार योगा आणि आयुर्वेदाने कोरोनावर उपचार होऊ शकतात.  या अभ्यासाबाबत  सामाधानकारक पुरावे  आहेत का? असा प्रश्न उपस्थित  केला आहे. हे पुरावे मजबूत आहेत की कमकुवत याबाबतही विचारणा केली आहे. कोरोनाचं गंभीर स्वरुप हाइपर इम्यून स्टेटस आहे की इम्यून डेफिशियेंसी स्टेटस?,  याबाबत वैज्ञानिकांचे दाखले आहेत का अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले आहेत. 

याशिवाय आरोग्य मंत्रालयाकडून कोरोनाच्या उपचारांसाठी कोणती चाचणी केली जात आहे? सरकारमधील किती मंत्र्यांनी या प्रोटोकॉल्सच्या आधारे आपले उपचार केले आहेत? जर या प्रोटोकॉल्समध्ये तथ्य असेल तर  कोविड केअर आयुष मंत्रालयाकडे सोपवण्यास कोणी रोखले आहे? या प्रश्नांबाबत आरोग्यमंत्रालयाकडून स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.

आयएमएने सांगितले की, 'जर असं नसेल तर एका प्लेसिबोवर औषधाचं नाव देऊन देशभरातील रुग्णांना धोका दिल्यासारखं होईल.' हे प्रोटोकॉल्स आणि वैज्ञानिक आधारांवर प्रश्न उपस्थित करताना केंदीय आरोग्य मंत्रालयाकडून त्यांनी केलेल्या दाव्याबाबत पुरावे मागितले आहेत.  

डॉक्टर हर्षवर्धन से सवाल

आयुष मंत्रालयानं दिल्या होत्या 'या' गाईडलाईन्स

या नवीन प्रोटोकॉल्सनुसार काही गुणकारी औषधांच्या सेवनाने कोरोनापासून बचाव होऊ शकतो असं स्पष्ट करण्यात आलं होतं. आयुष-64 हे औषध कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी परिणामकारक ठरत असल्याचे सांगितले होते. आयुष मंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी रोज अश्वगंधा १-३  ग्राम एमजी एक्स्ट्रॅकचा वापर करायला हवा. याशिवाय गरम पाणी किंवा दूधासह १० ग्राम च्यवनप्राशचे सेवन करायला हवे. कोरोनाची लक्षणं नसलेल्या रुग्णांना आयुष -64 गोळ्या  घेण्याचा सल्ला दिला होता. सावधान! हवेतून वेगाने होतोय कोरोनाचा प्रसार, CDC च्या तज्ज्ञांनी दिली धोक्याची सुचना

कोरोनाची हलकी लक्षणं म्हणजेच ताप, खोकला, घसादुखी,  अतिसाराची समस्या उद्भवत असेल तर गुडुची, पीपली यांचे दोनवेळा सेवन करायला हवे. याव्यतिरिक्त आयुष-64 चे औषध ५०० एमजी च्या दोन कॅप्सूल १५ दिवसांपर्यंत घ्यायला हव्यात. विशेष प्रकारचे योगा, व्यायाम  करायला हवेत. त्यासाठी  ४५ मिनिटं, ३० मिनिटं वेळ काढायला हवा. योगशिक्षकांच्या निरिक्षणाखाली योगा प्रकार केल्यास शरीरासाठी उत्तम ठरेल. असा दावा करण्यात आला होता. काळजी वाढली! थंडी अन् प्रदूषणामुळे कोरोनाचा प्रसार वाढणार, एम्सच्या डॉक्टरांची धोक्याची सुचना

Web Title: Ima asks health minister to produce proof on ayush yoga based treatment of covid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.