खरं की काय? 'या' साड्या नेसल्यानं रोगप्रतिकारकशक्ती वाढणार; कोरोनापासून होईल बचाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 06:59 PM2020-08-20T18:59:47+5:302020-08-20T19:11:23+5:30
सरकारने रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी (immunity booster saree) साडी लाँच केली आहे.
कोरोना व्हायरसं भारतासह संपूर्ण जगभरात कहर केला आहे. कोरोना विषाणूंपासून बचावासाठी सर्वत्र मास्क, सॅनिटायजरचा वापर केला जात आहे. तसंच व्हायरसशी लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जात आहे. वेगवेगळ्या प्रकारची उत्पादन बाजारात येत आहे. रोगप्रतिकारकशक्ती वाढवून व्हायरसशी लढण्यासाठी ही औषधं उपयुक्त ठरत असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे आता इम्युनिटी वाढणारी साडी सुद्धा बाजारात आली आहे. होय. खरंच मध्य प्रदेशमध्ये काढा, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधांचं सेवन करण्याचा सल्ला देत आहे. अशात आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे ते म्हणजे रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारी साडी.
मध्य प्रदेश सरकारने रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी (immunity booster saree) साडी लाँच केली आहे. ही साडी रोगप्रतिकारक शक्ती वाढवून व्हायरस आणि बॅक्टेरियांपासून बचाव करण्यात मदत करेल, असा दावा केला जात आहे. या हर्बल आणि रोगप्रतिकाराकशक्ती वाढवत असलेल्या साड्यांना आयुर्वस्त्र असं नाव देण्यात आलं आहे. चला तर मग जाणून घेऊया या साड्या कशा तयार केल्या जात आहेत. एक साडी तयार करण्यासाठी ५ ते ६ दिवस लागतात. या साड्या तयार करण्यासाठी मसाल्यांचा वापर केला जातो.
यामध्ये मोठी वेलची, छोटी वेलची, चक्रीफूल, जावित्री, दालचिनी, काळी मिरी, शाही जिरा, तमालपत्र, लवंग यांचा समावेश आहे. सर्व मसाले बारीक कुटून २ दिवसांपेक्षा जास्त जास्त वेळ एका कापडात गुंडाळून एका भांड्यात पाण्यात टाकलं जातं आणि भट्टीवर हे पाणी उकळलं जातं. त्यानंतर ज्या साडीच्या कापडाला अनेक तासांपर्यंत वाफेने प्रक्रिया केली जाते. या साड्यांवर वेगवेगळ्या मसाल्यांची प्रक्रिया करण्यात आली आहे. साड्यांचा परिणाम चार ते पाच वॉशपर्यंतच राहतो. त्यामुळे साड्या धुण्यासाठी कमी केमिकलविरहित पावडरचा वापर करावा. जेणेकरून त्याचा परिणाम जास्त दिवस राहिल असा सल्ला दिला जातो.
मध्य प्रदेशच्या हातमाग आणि हस्तकला महामंडळाचे आयुक्त राजीव शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राचीन काळात ऋषीमुनींच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या वस्त्रांची प्राचीन विद्या आणि परंपरेला पुन्हा जिवंत करण्याची संधी मिळाली आहे. कोरोना काळात दोन महिने ट्रायल करण्यात आलं त्यानंतर योग्य तो मार्ग काढून मसल्यांपासून मिश्रण तयार करण्यात आलं आणि त्यानंतर हे आयुर्वस्त्र तयार करण्यात आलं आहे. तीन ते चार हजार रुपयांपर्यंत या साडीची किंमत आहे. या साड्यांची विक्री भोपाळ आणि इंदोरमध्ये होते आहे. लवकरच इतर देशांमध्ये या साड्या उपलब्ध होतील.
अरे व्वा! लोकांनी टाकून दिलेल्या मास्कपासून लाखो रुपयांच्या वीटा तयार करतो 'हा' अवलिया
बबड्या चांगला का वाईट ठाऊक नाही, पण...; महाराष्ट्र पोलिसांकडून 'कहानी में ट्विस्ट'