सोशल मीडियामुळे मुलं जास्त खात आहेत जंक फूड - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 01:08 PM2019-03-28T13:08:56+5:302019-03-28T13:10:09+5:30
सध्या लहान मुलांना जंक फूडपासून दूर ठेवणं कठिण होत आहे. जंक फूड फक्त आपल्या शरीराचं आरोग्य राखण्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्य राखण्यासाठीही मदत करतं. अशा जंक फूडपासून मुलांना लांब ठेवणं अत्यंत गरजेचं असतं.
(Image Credit : womenpla.net)
सध्या लहान मुलांना जंक फूडपासून दूर ठेवणं कठिण होत आहे. जंक फूड फक्त आपल्या शरीराचं आरोग्य राखण्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्य राखण्यासाठीही मदत करतं. अशा जंक फूडपासून मुलांना लांब ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. पण सोशल मीडियाच्या युगामध्ये मुलांसमोर सतत येणाऱ्या जंक फूडच्या जाहिराती त्यांना या पदार्थांपासून दूर नेण्याऐवजी त्यांना या पदार्थांकडे आणखी आकर्षित करण्याचं काम करत आहेत. अशातच एका नव्या संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की, मुलं आपला जास्तीत जास्त वेळ सोशल मीडियावर खर्च करत असल्यामुळे ते जंक फूडचंही सेवन जास्त करतात.
पेडियाट्रिक्समध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसार, टिव्ही आणि सोशल मीडियावर होणारा जंक फूडचा प्रचार आणि जाहिराती यांमुळे मोठ्या प्रमाणावर जंक फूडकडे आकर्षित होत आहेत. संशोधनामध्ये या गोष्टीकडेही लक्ष वेधण्यात आलं की, सध्या सोशल मीडियावर फूड व्लॉग्सचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. यामुळे मुलं सतत यूट्यूब किंवा इतर प्लॅटफॉर्म्सवर हे व्हिडीओ सतत पाहात असतात.
ऑफकामच्या रिपोर्टनुसार, 8 ते 11 वर्षांच्या मुलांमधील 93 टक्के मुलं ऑनलाइन जातात. 77 टक्के यूट्यूबचा वापर करतात आमि 18 टक्के मुलांचे सोशल मीडियावर अकाउंट्स आहेत. तेच 12 ते 15 वर्षांच्या मुलांमध्ये 99 टक्के ऑनलाइन जातात, 89 टक्के यूट्यूबचा वापर करतात आणि 69 टक्के मुलं सोशल मीडियाचा वापर करतात.
या संशोधनाचा आधार घेऊन न्यू यूनिवर्सिटी ऑफ लिवरपूल रिसर्चने एका संशोधन केलं आहे. या संशोधनामध्ये 176 मुलांनी भाग घेतला होता. दरम्यान या 176 मुलांना तीन ग्रुप्समध्ये विभाग्यात आलं होतं. एका ग्रुपला इन्स्टाग्रामवरील जंक फूडला प्रमोट करणारा व्लॉग दाखवण्यात आला. तसेच दुसऱ्या ग्रुपला इन्स्टाग्रामवरील हेल्दी फूड प्रमोट करणारा व्लॉग दाखवण्यात आला. तसेच तिसऱ्या ग्रुपला खाण्याव्यतिरिक्त इतर फोटो दाखवण्यात आले.
या संशोधनातून आलेले निष्कर्ष आश्चर्यचकित करणारे होते. ज्या मुलांना इन्स्टाग्रामवर जंक फूडचे फोटो दाखवण्यात आले होते त्यांनी 32 टक्के कॅलरी जंक फूडच्या रूपामध्ये घेण्यास सुरुवात केली आणि संपूर्ण दिवसांमध्ये त्यांच्या कॅलरी इनटेकमध्ये 26 टक्क्यांनी वाढ झाली. तसेच ज्या मुलांना हेल्दी पदार्थांचे फोटो दाखव्यात आले. त्यांचा कॅलरी इनटेक आणि पहिल्या ग्रुपच्या कॅलरी इनटेकमध्ये जास्त अंतर नव्हते.
संशोधनाचा भाग असलेल्या अॅना कोट्स यांनी सांगितले की, 'आमच्या संशोधनामधून हे सिद्ध झाले की, सोशल मीडिया आणि दुसरे व्लॉग यांमुळे जंक फूडकडे मुलांचा वाडता कल दिसून येत आहे. तसेच दुसऱ्या बाजूला ज्या हेल्दी पदार्थांच्या जाहिराती करण्यात येत आहेत. याचा मुलांवर काहीच परिणाम होत नाही.
तसं पाहायला गेलं तर सध्या इंटरनेटवर कोणीही काहीही अपलोड करत असतात. आतापर्यंत अशी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही जी या गोष्टींवर नजर ठेवू शकेल. या मुद्दांवर चिंता करताना अॅना कोट्सने सांगितले की, 'सध्याच्या टाइममध्ये मुलं चित्रपटांतून कमी आणि व्लॉग्सने जास्त प्रभाव होतो. त्यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्मवर काही नियम लावण्यात येणं गरजेचं असतं. ज्यामुळे हे व्लॉगर मुलांना जंक फूड खाण्यासाठी प्रोत्साहित करू शकणार नाही.