भारतात 'या' ५ पदार्थांमुळे वाढत आहे डायबिटीसचा धोका, ICMR च्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 10:52 AM2024-10-09T10:52:18+5:302024-10-09T10:52:51+5:30
Diabetes Reason : या गंभीर आजारावर उपचार शोधण्यासाठी नुकताच एक रिसर्च करण्यात आला. ज्यातून डायबिटीसचा धोका कमी करण्यासाठी काही उपाय समोर आले आहेत.
Diabetes Reason : भारत देश हा डायबिटीसची राजधानी मानला जातो. कोणताही ठोस उपाय नसलेल्या या आजाराने कोट्यावधी लोक पीडित आहेत. या गंभीर आजारावर उपचार शोधण्यासाठी नुकताच एक रिसर्च करण्यात आला. ज्यातून डायबिटीसचा धोका कमी करण्यासाठी काही उपाय समोर आले आहेत. इंडियन मेडिकल काउन्सिल ऑफ रिसर्च (ICMR) आणि मद्रास डायबिटीज रिसर्च फाउन्डेशन, चेन्नई यांच्या मदतीने हा रिसर्च करण्यात आला.
या रिसर्चमध्ये २५ ते ४५ वयोगटाच्या ३८ लठ्ठ आणि जास्त वजन असलेल्या लोकांचा समावेश करण्यात आला होता. ज्यांचा बॉडी इंडेक्स २३ किंवा त्यापेक्षा जास्त होता. रिसर्च दरम्यान यात सहभागी लोकांना दोन आठवडे दोन प्रकारचे आहार देण्यात आले. एक हाय-AGE आणि दूसरा लो-AGE डाएट. रिसर्चच्या निष्कर्षानुसार, लो-AGE डाएटमुळे सहभागी लोकांच्या इन्सुलिन सेंसिटिव्हिटीमध्ये सुधारणा झाली. हा आहार घेतल्यानंतर सहभागी लोकांच्या रक्तात AGEs आणि सूज कमी दिसली. तर हाय-AGE आहार घेतल्यावर लोकांमध्ये याचं प्रमाण अधिक दिसलं.
काय आहे AGEs?
AGEs अशा नुकसानकारक तत्वांना म्हटलं जातं जे काही पदार्थ जास्त तापमानावर तळल्यावर तयार होतात. यात खासकरून तळलेले आणि प्रोसेस्ड फूडचा समावेश आहे. या तत्वांमुळे शरीरात सूज, इन्सुलिन रेसिस्टेन्स आणि इतर आरोग्यासंबंधी समस्या होतात. ज्यामुळे डाटबिटीस आणि हृदयरोगांचा धोका वाढतो.
कोणत्या पदार्थांमुळे वाढतोय डायबिटीसचा धोका?
- चिप्स, फ्राइड चिकन, समोसा, भजी यामुळे डायबिटीसचा धोका वाढतोय.
- कुकीज, केक, क्रॅकर्समुळेही याचा धोका वाढतो.
- रेडीमेड पदार्थ, मेयोनीज यामुळेही डायबिटीसचा धोका वाढतो.
- जास्त तापमानावर तयार केलं जाणारं मांस, ग्रिल्ड किंवा रोस्टेड मांस यामुळेही डायबिटीसचा धोका वाढतोय.
- भाजलेले ड्रायफ्रूट्स जसे की, अक्रोड, सूर्यफुलाच्या बीया यामुळेही डायबिटसचा धोका वाढतो.
वरील पदार्थ हे भारतीय आहारातील महत्वाचा भाग आहेत. हे पदार्थ जास्त तळले, भाजले, ग्रिल्ड केले, बेक केले तर यात AGE ची लेव्हल वाढते. एक्सपर्ट सांगतात की, प्रोसेस्ड आणि तेलकट पदार्थ टाळून ताज्या कडधान्यामुळे डायबिटीसचा धोका कमी केला जाऊ शकतो.