तुमचा जोडीदार ‘घोरी’ असेल तर..? काय उपाय कराल..?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 05:14 AM2022-01-20T05:14:57+5:302022-01-20T05:15:12+5:30

आपल्या जोडीदाराच्या किंवा घरात कोणी घोरत असेल तर त्याच्या घोरण्याचा आपल्यावर फारसा परिणाम होऊ द्यायचा नसेल, तर काय करायचं?

In Search of Snoring Solutions | तुमचा जोडीदार ‘घोरी’ असेल तर..? काय उपाय कराल..?

तुमचा जोडीदार ‘घोरी’ असेल तर..? काय उपाय कराल..?

googlenewsNext

झोपेचा आणि आरोग्याचा अतिशय जवळचा संबंध आहे. त्यातही आपला जोडीदार जर घोरत असेल तर त्या घोरण्यानंही तुमच्या झोपेचे बारा वाजतात आणि अर्थातच तुमच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होताे. पण आपल्या जोडीदाराच्या किंवा घरात कोणी घोरत असेल तर त्याच्या घोरण्याचा आपल्यावर फारसा परिणाम होऊ द्यायचा नसेल, तर काय करायचं?

१- घोरण्याच्या आवाजाकडे आणि सतत बदलणाऱ्या त्यातील ‘आरोह-अवरोहां’कडे आपलं लक्ष जाणार नाही, हे अशक्यच. त्यामुळे आपल्याला अतिशय अस्वस्थ होतं, चीडचीड होते, पण घोरण्याच्या आवाजावर लक्ष केंद्रित न करण्यासाठी तुम्ही स्वतःला प्रशिक्षित करू शकता. त्यामुळे तुम्हाला त्याचा फारसा त्रास होणार नाही. झोप लागेपर्यंत तरी तुम्ही ही ‘युक्ती’ वापरू शकता.

२- आणखी एक ‘स्वस्त’ आणि सोपा उपाय म्हणजे रात्रीच्या वेळी ‘करवतीने लाकूड कापल्याच्या आवाजानं’ आपण त्रस्त झाला असाल, तर सरळ कानात इअर प्लग घाला. त्यामुळे तुमच्या कानाजवळची ‘खरखर’ बंद होईल. कानात इअर प्लग घालायला आवडत नसेल तर ज्या ठिकाणी खूप गोंगाट असतो, अशा ठिकाणी बाहेरचा आवाज बंद करण्यासाठी अनेक जण हेडफोन वापरतात. त्याचाही वापर करता येईल.

३- रात्री झोपताना मंद संगीत ऐका किंवा व्हाईट नॉइज मशीनचा उपयोग करा. हे यंत्र सुसंगत आवाज निर्माण करतं, जे सुखदायी वाटतं. यासाठी पैसे खर्च करायचे नसतील तर सरळ आपल्या स्मार्टफोनवर ते किंवा मेडिटेशन ॲप डाऊनलोड करा.

४- पाठीवर झोपल्यावर बऱ्याचदा घोरण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे तुमचा पार्टनर घोरत असेल तर त्याची झोपेची पोझिशन बदला. बाजारात ‘हेड पोझिशनिंग पिलो’ किंवा ‘स्नोअर रिड्युसिंग ट्रेनर’सारख्या गोष्टी मिळतात. ज्यामुळे पार्टनरला पाठीवर झोपणं अवघड होतं आणि त्याचं घोरणंही थांबतं.

५- पुरुष जसं घोरतात, तसं स्त्रियाही घोरतात, पण त्यांच्या घोरण्याविषयी फारसं बोललं जात नाही. ‘घोरणं नैसर्गिक आहे’, असं समजून सोडून देऊ नका. ‘घोरु नकोस’ असं जोडीदाराच्या सतत कानीकपाळी ओरडत राहिलं तरी त्याचं घोरणं कमी होणार नाही किंवा थांबणार नाही. त्याऐवजी आपल्या जोडीदाराला ‘स्लिप क्लिनिक’मध्ये घेऊन जा. त्यामुळे घोरण्याचं नेमकं कारण कळेल आणि त्यानुसार उपाययोजनाही करता येतील. 

Web Title: In Search of Snoring Solutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.