या आजारात झोपेतच होतो रुग्णांचा मृत्यू, लक्षणं दिसताच सावध व्हा! नाही तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 06:04 PM2023-01-11T18:04:31+5:302023-01-11T18:05:41+5:30
या आजारात झोपेमध्येच श्वासोच्छवास बंद होऊन व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.
निरोगी शरीरासाठी योग्य आहार आणि दिनचर्येसोबतच चांगली झोपही अत्यंत महत्वाची आहे. आज बिघडलेली जीवनशैली आणि ताणाव हा लोकांच्या झोपेतील सर्वात मोठा अडथळा बनला आहे. व्यवस्थित झोप न झाल्याने अनेक आजारांचा धोका वाढतो. मात्र, 'स्लीप अॅपनिया' हा एक असा आजार आहे, ज्यामुळे झोपलेल्या लोकांसाठी मोठा धोका निर्माण होतो. या आजारात झोपेमध्येच श्वासोच्छवास बंद होऊन व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.
स्लीप अॅपनिया म्हणजे काय?
स्लीप अॅपनिया हा एक झोपेशी संबंधित आजारा आहे. या आजारात झोपेत असतानाच व्यक्तीचा श्वास थांबतो. अनेकदा तर या आजारात आपला श्वास थांबत आहे, हे संबंधित व्यक्तीलाही कळत नाही. कारण श्वास पुन्ह लगेच सुरू होतो. ब्रिदिंग प्रॉब्लेम सुरू झाला की व्यक्ती कूस बदलते आणि खोकलते. झोपेत होणाऱ्या या कृती साधारणपणे लोकांना समजत नाही आणि ही एक समस्या होऊन बसते. महत्वाचे म्हणजे, हा आजार दीर्घकाळ राहिल्यास स्ट्रोक येण्याचीही शक्यता असते.
अशी आहेत लक्षणं -
1- स्लीप अॅपनिया झाल्यास, झोपताना अस्वस्थ झाल्यासारखे वाटते.
2- जोरात घोरणे
3- झोपेतच तोंडाला कोरड पडणे
4- सकाळी उठल्यानंतर डोके दुखणे
5- दिवसा सुस्ती आणि झोप होणे
6- चिडचिड होणे
7- एकाग्रतेची कमतरत
या लोकांना असू शकतो स्ट्रोकचा धोका, असे रहा सुरक्षित... -
वय 50 ते 55 असलेल्या लोकांना स्लीप अॅपनियाचा धोका सर्वाधिक असतो. जर कुणाला बीपी, डायबेटीज, हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असेल, तर त्यांना या आजारामुळे स्ट्रोक येऊ शकतो. तसे काही वेळी कुटुंबातील स्ट्रोक हिस्ट्रीमुळेही ही समस्या निर्माण होऊ शकते.
यामुळे, आपल्याल वरील पैकी काही लक्षणे दिसून आल्यास स्लीप अॅपनिया आजारावर उपचार घ्यायला हवा. याच बरोबर, हा आजार झाल्यास स्मोकिंग आणि दारूपासूनही दूर राहायला हवे.