इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 06:35 AM2024-11-27T06:35:33+5:302024-11-27T06:36:07+5:30

महामुंबईत आढळले सर्वाधिक रुग्ण, सध्या दुसऱ्या, तिमाहीतील गरोदर मातांसोबत मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना, आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे. 

In the last year, the number of Influenza-A patients has increased in the state, and a total of 57 patients have died from this disease | इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?

इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?

मुंबई - गेल्या वर्षभरात राज्यात ‘इन्फ्लुएंझा-ए’चे रुग्ण वाढले असून, एकूण ५७ रुग्णांचा या आजराने मृत्यू झाला आहे. राज्यात २,३२५ रुग्ण आढळले असून, सर्वाधिक ७७९ रुग्ण मुंबईत असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. 

आरोग्य विभागाने  १ जानेवारी ते २१ नोव्हेंबर पर्यंतची ‘इन्फ्लुएंझा’ची आकडेवारी जाहीर केली. त्यामध्ये  महामुंबई परिसरात रुग्ण आढळून आले. आजाराच्या प्रतिबंधासाठी आरोग्य विभाग उपयोजना करत आहेत. अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी ऐच्छिक लस मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या दुसऱ्या, तिमाहीतील गरोदर मातांसोबत मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना, आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे. 

यांनी काळजी घ्यावी...
या लक्षणांसोबतच तीव्र घसादुखीचा त्रास होत असेल, घशाला सूज आली असेल आणि ताप ९८ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर अशा अतिजोखमीच्या रुग्णांची  (गरोदर माता, उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनीचे विकार, कर्करोग, दमा असे विकार असणाऱ्या व्यक्ती)  तपासणी आवश्यक आहे. 

इन्फ्लुएंझावर उपाय काय?
नागरिकांनी आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवणे गरजेचे आहे.
संतुलित आहार करणे गजरेचे असून, त्यासोबत व्यायाम करावा. 
आहारात लिंबू, आवळा, मोसंबी, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. 
भरपूर पाणी प्यावे आणि वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा. 
या आजाराची लक्षणे आढळल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.

‘इन्फ्लुएंझा’ची लक्षणे काय आहेत ?

कोरोनाच्या आजराप्रमाणेच स्वाइन फ्लूची लक्षणे आहेत. यामध्ये सौम्य आणि गंभीर स्वरूपाची लक्षणे आढळून येतात. या आजारात ताप, खोकला, घसा दुखी, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, उलट्या या लक्षणांचा समावेश आहे.

‘इन्फ्लुएंझा’चे जिल्हानिहाय रुग्ण 

  •     मुंबई     ७७९ 
  •     ठाणे     २५० 
  •     मीरा-भाईंदर     १३ 
  •     नवी मुंबई     ६ 
  •     ठाणे ग्रामीण     ५
  •     कल्याण     २
  •     रायगड     १

 

 

Read in English

Web Title: In the last year, the number of Influenza-A patients has increased in the state, and a total of 57 patients have died from this disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य