कोणत्या समस्या असलेल्या लोकांनी दह्याचं करू नये सेवन? वाचाल तर रहाल फायद्यात!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 01:02 PM2024-09-27T13:02:18+5:302024-09-27T13:03:35+5:30

Who Should not eat curd : दह्याचे जसे भरपूर फायदे आहेत, तसेच त्याचे काही नुकसानही आहेत. ज्यामुळे दह्याचा आहारात समावेश करताना काळजी घेतली पाहिजे.

In which disease curd should not be consumed | कोणत्या समस्या असलेल्या लोकांनी दह्याचं करू नये सेवन? वाचाल तर रहाल फायद्यात!

कोणत्या समस्या असलेल्या लोकांनी दह्याचं करू नये सेवन? वाचाल तर रहाल फायद्यात!

Who Should not eat curd : दह्याचं सेवन भरपूर लोक आवडीने करतात. दह्याचं वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या पदार्थांसोबत सेवन केलं जातं. दही खायला तर टेस्टी लागतच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन बी६, बी१२ सारखे पोषक तत्व असतात. दही खासकरून डायजेशनसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. कारण यात प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांमध्ये हेल्दी बॅक्टेरिया वाढवतात.

मात्र, दह्याचे जसे भरपूर फायदे आहेत, तसेच त्याचे काही नुकसानही आहेत. ज्यामुळे दह्याचा आहारात समावेश करताना काळजी घेतली पाहिजे. खासकरून खालील चार समस्या असलेल्या लोकांनी दह्याचं चुकूनही सेवन करू नये. 

आर्थरायटिस

संधिवाताची समस्या असलेल्या रूग्णांनी दह्याचं सेवन चुकूनही करू नये. यात कॅल्शिअम भरपूर असतं जे हाडांसाठी फायदेशीर असतं. पण ही समस्या असल्यावर दह्याचं सेवन केल्याने जॉईंट्समधील वेदना वाढू शकते. दह्याऐवजी तुम्ही ताकाचं सेवन करू शकता.

अस्थमा

जर तुम्हाला अस्थमा असेल तर दह्याचं सेवन अजिबात करू नये. कारण दह्यामुळे अस्थमाचा अटॅक ट्रिगर होण्यााचा धोका असतो.

ल्यूकोरिया

जर तुम्हाला ल्यूकोरिया म्हणजे जास्त व्हाईट व्हजायनल डिस्चार्जची समस्या असेल तर दही खाऊ नये. दह्याचं सेवन केलं तर ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते.

हाय कोलेस्ट्रॉल 

हाय कोलेस्ट्रॉल असल्याननंतर फुल फॅट दह्याचं सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल आणखी वाढू शकतं. अशात दह्याऐवजी तुम्ही ताकाचं सेवन करू शकता.

बद्धकोष्ठता

तसं तर दही गट हेल्थसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. पण जर तुम्हाला गॅस, बद्धकोष्ठता, ब्लोटिंगसारख्या समस्या असेल तर दह्याचं सेवन करू नये. याने समस्या अधिक वाढू शकते.

Web Title: In which disease curd should not be consumed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.