कॅल्शिअमची खाण आहेत 'या' काळ्या बीया, शरीरातील पूर्ण हाडे होतात मजबूत!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 10:08 AM2024-07-29T10:08:24+5:302024-07-29T10:09:14+5:30
Black Sesame Seeds : जर तुम्ही दूध पित नसाल आणि तुम्हाला कॅल्शिअमची कमतरता भरून काढायची असेल तर तुम्ही एका खास गोष्टींचं सेवन करून शकता.
Black Sesame Seeds : कॅल्शिअम आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं असतं. दूध, दही, पनीरसारख्या गोष्टींमधून आपल्या शरीराला कॅल्शिअम मिळतं. पण अनेकजण याचं सेवन करत नाहीत. ज्यामुळे हाडं मजबूत होत नाहीत. भरपूर कॅल्शिअमसाठी भरपूर दूध प्यावं लागतं. पण जर तुम्ही दूध पित नसाल आणि तुम्हाला कॅल्शिअमची कमतरता भरून काढायची असेल तर तुम्ही एका खास गोष्टींचं सेवन करून शकता. जेणेकरून तुमची हाडे मजबूत होतील. ही गोष्ट म्हणजे तीळ.
तिळामध्ये भरपूर कॅल्शिअम
तिळामध्ये दुधापेक्षाही जास्त कॅल्शिअम असतं. महत्वाची बाब म्हणजे तिळाचं सेवन तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. तीळ तुम्ही भाजून रिकाम्या पोटी खाऊ शकता किंवा तिळाचे लाडू बनवून खाऊ शकता. तसेच तिळाची चटणीही खाऊ शकता. इतकंच नाही तर तीळ तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांमध्येही टाकू शकता.
10 पट जास्त कॅल्शिअम
काळ्या तिळामध्ये कॅल्शिअमचं प्रमाण दुधापेक्षा जास्त असतं. 100 ml फुल क्रीम दुधातून जवळपास 123mg कॅल्शिअम मिळतं. तर तेवढच्या काळ्या तिळामध्ये 1286mg कॅल्शिअम असतं. याने हाडे मजबूत होतात आणि हाडांचा विकासही होतो.
मॅग्नेशिअम आणि फॉस्फोरस
काळ्या तिळामध्ये केवळ कॅल्शिअमच नाही तर इतरही अनेक पोषक तत्व भरपूर असतात. काळ्या तिळामध्ये मॅग्नेशिअम आणि फॉस्फोरस भरपूर असतं. जे हाडांच्या आरोग्यासाठी महत्वाचं असतं. हाडं रिपेअर करण्याचं कामही या गोष्टी करतात.
झिंक
काळ्या तिळांमध्ये झिंकही असतं. जे बोन डेंसिटी वाढवण्यास मदत करतं. यामुळे ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारापासून बचाव होतो. या तत्वामुळे हाडे कमजोर होत नाही आणि हाड मोडण्याचा धोकाही कमी होतो.
हाडांसाठी प्रोटीन
काळ्या तिळामध्ये भरपूर प्रोटीन असतं. ज्यामुळे हाडे आणखी मजबूत होतात. हाडांच्या विकासासाठी आणि रिपेअरिंगसाठी हे फार गरजेचं असतं. याने शरीरातील सगळी हाडे मजबूत होतात.