हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर ठरते बाजरी, कशी ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 10:14 AM2019-11-04T10:14:54+5:302019-11-04T10:15:06+5:30
डायबिटीस डाएट तेव्हाच चांगली मानली जाते, जेव्हा या डाएटच्या मदतीने ब्लड शुगर कंट्रोल करणं सोपं होतं.
डायबिटीस डाएट तेव्हाच चांगली मानली जाते, जेव्हा या डाएटच्या मदतीने ब्लड शुगर कंट्रोल करणं सोपं होतं. हाय ब्लड शुगरची स्थिती डायबिटीसच्या रूग्णांची सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे डायबिटीसने ग्रस्त व्यक्तीला असा आहार दिला जातो, ज्याने त्यांची ब्लड शुगर लेव्हल वेगाने वाढणार नाही. असंच एक धान्य आहे बाजरी जे डायबिटीसच्या रूग्णांनी नक्की खावं.
बाजरी देशी सुपरफूड
द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण आशियामध्ये बाजरीची भाकरी, बाजरीची खिचडी आवडीने खाल्ली जाते. बाजरीच्या भाकरी मोठ्या आवडीने लोक खातात. बाजरीतील पौष्टिक तत्वांमुळे बाजरीला 'गरीबांचं सुपरफूड' मानली जाते.
बाजरीमध्ये शरीरासाठी आवश्यक कॅल्शिअम, कॉपर, आयर्न, मॅग्नेशिअम, मॅगनीज, सेलेनियम, पोटॅशिअम आणि फॉस्फोरस सारखे तत्व भरपूर प्रमाणात असतात. सोबतच यात अनेक मायक्रोन्यूट्रिएंट्सही असतात. त्यामुळे बाजरीला पारंपारिक पदार्थांमध्ये स्थान दिलं जातं. या सर्वच तत्वांमुळे डायबिटीसच्या रूग्णांचं आरोग्य चांगलं राहण्यास याने मदत मिळते.
डायबिटीस रूग्णांसाठी बाजरी कशी फायदेशीर
मॅग्नेशिअम ब्लड शुगर लेव्हलला मेंटेन ठेवण्यास मदत करतं. हे तत्व इन्सुलिनला योग्यप्रकारे काम करण्यास मदत करतं. ज्याने ब्लड शुगर लेव्हलही वाढत नाही. याने ग्लूकोज हळूहळू रिलीज होण्यास मदत मिळते. ज्यामुळे जेवणानंतर लगेच डायबिटीक्सचं ब्लड शुगर लेव्हल हाय दिसत नाही.
बाजरीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. फायबर स्लो मेटाबॉलिक्स रेटचा वेग वाढतो. ज्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. त्यासोबतच बाजरी पचनक्रिया चांगली ठेवण्यासही मदत करते. साधारपणे पोटाच्या समस्या डायबिटीस असलेल्या लोकांमध्ये असतातच. त्यामुळे बाजरी डायबिटीसमध्ये एक आदर्श आहार ठरू शकते.
(टिप : वरील लेखातील टिप्स या केवळ माहिती म्हणून देण्यात आल्या आहेत. यांचा वापर करण्यासाठी एकदा तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा.)