जास्त प्रोटीनमुळे प्रौढावस्थेतही होतो फायदा, जाणून घ्या प्रोटीनचं महत्त्व!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 10:13 AM2018-11-05T10:13:02+5:302018-11-05T10:13:58+5:30
प्रोटीन हे शरीराची क्रिया योग्यप्रकारे होण्यासाठी किती महत्त्वाचं आहे. हे सर्वांनाच माहीत आहे.
प्रोटीन हे शरीराची क्रिया योग्यप्रकारे होण्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे सर्वांनाच माहीत आहे. आता प्रोटीनच्या गरजेबाबत नुकतच एक संशोधन करण्यात आलं असून यातून आहारात प्रोटीनचं प्रमाण वाढवल्याने प्रौढ व्यक्तींची दैनंदिन क्रिया करण्याची क्षमता कायम राहते आणि सोबतच क्षमता वाढवण्यास मदत होते.
ब्रिटनचे न्यूकॅस्टल विश्वविद्यालयाचे प्रमुख अभ्यासक नुनो मेंडोनका म्हणाले की, 'या शोधातून हे समोर आले आहे की, दररोज आहारात प्रोटीनचा समावेश केल्याने शरीर सक्रिय राहतं'. या अभ्यासासाठी उत्तर-पूर्व इंग्लंडच्या ७२२ जणांना सहभागी करुन घेण्यात आले होते. यात ६० टक्के महिलांचा समावेश होता. हे संशोधन अमेरिकन जेरीएट्रिक्स सोसायटीच्या मॅगझिनमध्ये प्रकाशित झालंय.
तरुणांच्या तुलनेत कमी प्रोटीन घेणाऱ्या प्रौढांचं आरोग्य चांगलं राहत नसल्याने त्यांच्या शारीरिक क्रियेत कमतरता येते. तसेच दात व चेहऱ्यातही बदल होतो. या अभ्यासाच्या निष्कर्षातून हे समोर आलं आहे की, जे जास्त प्रोटीन घेतात ते कमी प्रोटीन घेणाऱ्यांपेक्षा अधिक सक्षम असतात. त्यामुळे अभ्यासकांनी सल्ला दिला आहे की, प्रौढ व्यक्तींनी दररोज आहारात प्रोटीनचा समावेश करावा.
प्रोटीनचे फायदे
प्रोटीन हे शरीरासाठी महत्त्वाचं असतं. प्रोटीन शरीरात नव्या पेशी तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. लहान मुलं, वृद्ध, तरुण इतकेच काय तर गर्भवती महिलांसाठीही प्रोटीन गरजेचं असतं. प्रोटीनशिवाय कुणीही आपली दैनंदिन कामे योग्यप्रकारे करु शकणार नाहीत. कारण प्रोटीनचं काम शरीरातील कमजोरी दूर करुन क्षमता वाढवणं हे असतं. तसेच याने पचन रसाचीही निर्मिती होते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जर तुमचं वजन ५० किलो असेल रोज ५० ग्रॅम प्रोटीन घेणे गरजेचे आहे.
हिवाळ्यात प्रोटीनची गरज अधिक
थंडीच्या दिवसात पचनक्रिया चांगली असते, त्यामुळे या दिवसात प्रोटीन अधिक प्रमाणात घेतलं जाऊ शकतं. गरमीच्या दिवसात प्रोटीन कमी प्रमाणात घ्यावं कारण प्रोटीनमध्ये कार्बोज-कार्बोहायड्रेटचं प्रमाण अधिक असतं. कार्बोज-कार्बोहायड्रेटमुळे शरीराला अधिक गरमी होते, याने समस्या निर्माण होऊ शकते. तसेच पावसाळ्यातही प्रोटीन कमी प्रमाणात घ्यावं.
दूध, पनीर, मांस, इडली-डोसा, डाळ, तांदूळ, सोयाबीन, मटर, चणे, शेंगदाणे, मोड आलेलं पदार्थ यांमध्ये प्रोटीनचं अधिक प्रमाण असतं. त्यामुळे आहारात प्रोटीनचा संतुलित प्रमाणात समावेश करावा. प्रोटीन घेतलं नाही तर शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळणार नाही. त्यामुळे प्रोटीनच्या कमतरतेमुळे तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.