वजन कमी करण्यासाठी बेसनाचा कसा फायदा होतो; हे तुम्हाला माहीत आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 11:05 AM2019-09-16T11:05:39+5:302019-09-16T11:06:01+5:30
अनेकांचा असा गैरसमज असतो की, बेसनापासून तयार करण्यात आलेले पदार्थ फक्त चवीला उत्तम असतात. पण आरोग्यासाठी ते घातक असतात. एवढचं नाहीतर अनेकदा बेसनामध्ये अजिबात न्यूट्रिशन्स वॅल्यू नसतात असाही अनेकांचा समज असतो.
अनेकांचा असा गैरसमज असतो की, बेसनापासून तयार करण्यात आलेले पदार्थ फक्त चवीला उत्तम असतात. पण आरोग्यासाठी ते घातक असतात. एवढचं नाहीतर अनेकदा बेसनामध्ये अजिबात न्यूट्रिशन्स वॅल्यू नसतात असाही अनेकांचा समज असतो. तुम्हीही असाच विचार करत असाल तर तुम्ही अत्यंत चुकीचा विचार करत आहात. बेसनामध्ये पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात आणि त्यांच्यामध्ये अनेक हेल्थ बेनिफिट्स असतात. बेसनामध्ये प्रोटीनचं प्रमाण उत्तम असतं आणि हे शाकाहारी लोकांच्या शरीरातील प्रोटीनचं प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी मदत करतं. एवढचं नाहीतर बेसन वजन कमी करण्यासाठीही मदत करतं.
गव्हाच्या पिठाच्या तुलनेमध्ये बेसनामध्ये कॅलरी आणि फॅट्स कमी असतात
जर तुम्ही वेट लॉस करण्याचा विचार करत असाल तर वजन कमी करण्यासाठी बेसन फायदेशीर ठरू शकतं. गव्हाच्या पिठाच्या तुलनेमध्ये बेसनामध्ये कॅलरी आणि फॅट्स कमी असतात आणि फायबरचं प्रमाण अधिक असतं. परिणामी आपल्या डाएटमध्ये प्रोटीन आणि फायबरचा समावेश केल्यामुळे भूक कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. बऱ्याच वेळेपर्यंत पोट भरल्याप्रमाणे वाटतं आणि कॅलरी इनटेकही कमी होतो. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. बेसनापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचा समावेश केल्याने वजन कमी करण्यास मदत होते.
बेसनापासून तयार करा हेल्दी ढोकळा
गुजराती लोकांचं फेवरेट स्नॅक म्हणजे, ढोकळा. जो टेस्टी असण्यासोबतच हेल्दीही असतो. आणि तो खाल्लाने तुमचं पोट बराच वेळ भरल्याप्रमाणे जाणवतं. त्यामुळे तुम्ही ओव्हर इटिंगपासून दूर राहता. ढोकळ्यामध्ये न्यूट्रिशनल वॅल्यू मोठ्या प्रमाणावर असतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ढोकळा तयार करण्यासाठी तेलाचा वापर करण्यात येत नाही. कारण ढोकळा वाफेवर शिजवण्यात येतो. त्यामुळे हा आरोग्यासोबतच वजन कमी करण्यासाठीही मदत करतो.
बेसनाचा पोळा खा अन् वजन कमी करा...
बेसनापासून तयार करण्यात आलेला टेस्टी पोळा सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे. मुबलक प्रमाणात प्रोटीन असलेला हा पोळा खाऊन जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करत असाल तर बराच वेळ तुम्हाला भूक लागणार नाही. त्यामुळे तुम्ही ओव्हरइटिंगपासून दूर राहू शकता. तसेच एनर्जेटिकही राहू शकता. शक्य असेल तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या एकत्र करून हा पोळा आणखी हेल्दी करू शकता. तसचे पोळा तयार करताना शक्य तेवढ्या कमी तेलाचा वापर करा. त्यामुळे पोळा आणखी हेल्दी होण्यास मदत होईल.
बेसनाचा हलवा
बेसनापासून तयार करण्यात आलेला हलवा खाऊन तुम्ही वजन कमी करू शकता. परंतु, लक्षात ठेवा हलवा तयार करण्यासाठी शुद्ध तुपाचाच वापर करा. कारण तूपही वजन कमी करण्यासाठी मदत करतं. तूपामध्ये बेसन व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये दूध आणि थोडीशी साखर एकत्र करून टेस्टी हलवा बेसनाचा टेस्टी हलवा तयार करा. जर तुम्ही जास्त हेल्थ कॉन्शिअस असाल तर त्यामध्ये साखरेऐवजी लो-कॅलरी स्वीटनरचाही वापर करू शकता.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.)