डेंग्यु झाल्यावर जेवणात समावेश करा 'या' पदार्थांचा; शक्तीवर्धक अन् पचायला हलके
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 09:13 PM2021-05-23T21:13:57+5:302021-05-23T21:15:54+5:30
समजा तुम्हाला डेंग्यु झालाच तर त्यावेळी तुमचे डाएट कसे असावे याचे मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करणार आहोत.
पावसाळा जवळ आला की त्याबरोबर येणारे रोगही पसरू लागतात. आता तर कोरोनाचा कहर आहेच पण पावसाळ्यात इतरही आजार उद्भवू शकतात. त्यापैकीच एक म्हणजे डेंग्यू. समजा तुम्हाला डेंग्यु झालाच तर त्यावेळी तुमचे डाएट कसे असावे याचे मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करणार आहोत.
सकाळी उठल्यानंतर
सकाळी उठल्यानंतर गुळवेल किंवा अॅलोवेराचा ज्यूस पिणे हे डेंग्युच्या काळात उत्तम मानले जाते. फक्त हा ज्युस उपाशी पोटी प्यावा.
नाश्ता करताना
शेवयांचा उपमा, उपमा, पोहे, दलिया आदी पदार्थ तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता. हे पदार्थ पचायला हलके आणि शक्तीवर्धक आहेत.
दुपारच्या जेवणापुर्वी
दुपारचे जेवण होण्याआधी रुग्णाला जर भूक लागली असेल तर नारळाचे पाणी किंवा अंदाजे पाव कप पपईच्या पानांचा ज्युस द्यावा.
दुपारचे जेवण
घरी बनवलेलं अन्न हे डेंग्युच्या रुग्णांसाठी उपयोगी आहे. यात पोळी, भात, डाळ, उकडलेल्या भाज्या किंवा तांदळाची खिचडी तसेच दही असे पदार्थ खाऊ शकता.
संध्याकाळचा नाश्ता
संध्याकाळी शक्यतो काहीही खाण्याचे टाळा. अगदीच आवश्यक असेल तर ग्रीन टी, आल्याची चहा किंवा मीठ न घातलेले पपईच्या पानाचे ज्युस प्यावे.
रात्रीच्या जेवणाआधी
रात्रीच्या जेवणाआधी क्लिअर सुप किंवा टॉमेटोचे सुप पिणे अत्यंत फायदेशीर आहे.
रात्रीचे जेवण
तांदळाची खिचडी किंवा दलिया, उकडलेल्या भाज्या रात्रीच्या आहारात समाविष्ट कराव्यात.
रात्री झोपण्यापूर्वी
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दुध आणि हळद एकत्र करून पिणे उत्तम समजले जाते.