Health tips: शरीरातील या भागांवर गंभीर परिणाम करते वाढलेले कोलेस्ट्रॉल, वेळीच घ्या दक्षता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 09:12 AM2022-06-06T09:12:19+5:302022-06-06T09:15:32+5:30
शारिरीक हालचाली कमी झाल्या आहेत. परिणामी शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढीस लागले आहे. याला आपण खात असलेले ऑईली जेवणही कारणीभूत आहे. यामुळे जमा झालेले फॅट पुढे ब्लड प्रेशर, डायबिटीस आणि हार्ट अटॅकला आमंत्रण देते.
आपण तंत्रज्ञान युगात इतके पुढे गेलो आहोत की आपले जवळ जवळ सर्व काम मशिन्सवरच होते. त्यामुळे शारिरीक हालचाली कमी झाल्या आहेत. परिणामी शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढीस लागले आहे. याला आपण खात असलेले ऑईली जेवणही कारणीभूत आहे. यामुळे जमा झालेले फॅट पुढे ब्लड प्रेशर, डायबिटीस आणि हार्ट अटॅकला आमंत्रण देते.
कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?
कोलेस्ट्रॉल म्हणजे गुळासारखा चिकट द्रव्य. याचे दोन प्रकार आहेत. गुड व बॅड कोलेस्ट्रॉल. यातील गुड कोलेस्ट्रॉल शरिरात उत्तम पेशी निर्माण करतं. तेच बॅड कोलेस्ट्रॉलमुळे आजारांचा धोका वाढतो.
रक्तात किती कोलेस्ट्रॉलची आवश्यकता?
एका प्रौढ व्यक्तिच्या शरीरात २०० मिलिग्रॅम/डिएल इतके कोलेस्ट्रॉल असणे योग्य आहे. त्याची पातळी २४० मिलिग्रॅम/डिएलवर गेली तर हा धोका वेळीच ओळखा. तुमच्या जीवनशैलीत आणि खाण्यापिण्याच्या सवयी बदलण्याचा हा इशारा आहे.
पेरिफल आर्टरी
जर तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त झाले तर तुम्हाला पेरिफल आर्टरीचा धोका आहे. यामध्ये कोलेस्ट्रॉलमुळे धमन्या आकुंचन पावतात. यामुळे रक्ताभिसरणावर अत्यंत वाईट परिणाम होतो.
जेव्हा तुम्हाला हा आजार होतो आणि तुम्ही जास्त व्यायाम करता तेव्हा तुमच्या पार्श्वभागात तसेच जांघेमध्ये प्रचंड वेदना होतात. असे झाल्यास वेळीच कोलेस्ट्रॉलची तपासणी करुन घ्या.