​उन्हाळ्याच्या दिवसात अशी वाढवा एनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2016 02:58 PM2016-05-20T14:58:04+5:302016-05-20T20:28:04+5:30

मे हिटचा तडाखा अगदी जोरदार जाणवतोय. जेवण पोटभर होत नाही. नुसती तहान लागते. परंतु, पुरेसा आहार पोटात नसल्याने थकवा वाढत जातो. जास्त श्रम रावेत वाटत नाही. हे चित्र बदलायचे असेल तर केळी, दूध, अंडी, हे पदार्थ फारच उपयुक्त आहेत. जाणूया घेऊयात त्यांचे फायदे

Increase in summer days Energies | ​उन्हाळ्याच्या दिवसात अशी वाढवा एनर्जी

​उन्हाळ्याच्या दिवसात अशी वाढवा एनर्जी

Next

/>
केळी : केळी खाण्यामुळे एनर्जी वाढते. यामध्ये पोटेशिअमचे प्रमाण अधिक असते. त्याकरिता केळी ही दररोज खाणे आरोग्यासाठी उत्तम आहे.

दूध : कॅल्शिअम, व्हिटामीनच्या पोषण तत्वाच्या प्रमाणामुळे दुधाने एनर्जी वाढते. दररोज एक ग्लास  दूध घेतल्याने आपली हाडे मजबूत होतात. त्याचबरोबर दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते.

बदाम : बदामामुळे  ताकद येते हे सर्वांना माहिती आहे. त्यामध्ये असणाºया  व्हिटामीन ई व मॅग्नेशिअममुळे कोणतीही कमजोरी येत नाही. 

तुळशीच्या पानाचा चहा : तुळशीच्या पानामध्ये एंटी- ओक्सीडेंट्सबरोबरच अन्य महत्वाची पोषणतत्व असतात. तुळशीच्या पानापासून तयार केलेल्या कपभर चहामुळे ऊर्जा मिळते. त्याचबरोबर हाडे व मांसपेशीसुद्धा उत्तम राहते.

आवळा: शरीराला आवळ्यामुळे ऊर्जा मिळते. कमजोरी घालविण्यासाठी आवळ्याचे सेवन करणे हे खूप आवश्यक आहे. त्याकरिता कोणत्याही पद्धतीने केलेले आवळ्याचे सेवन हे फायदेशीर आहे.

नारळाचे तेल: वजन कमी करणे व इन्फेक्शन दूर करण्यासाठी नारळाचे तेल हे खूप महत्वाचे आहे. त्याचबरोबर हे कमजोरी दूर करण्यासाठीही फायदेशीर आहे. दररोज जेवणामध्ये या तेलाचे सेवन के ले तर मैटाबोलिज्म वाढते. ताकद येऊन कमजोरी आपोआप दूर होते. 

आंबा : फळांचा राजा असलेल्या आंब्यामध्ये आवश्यक व्हिटामीन व मिनरल्स असतात. त्यामुळे कमजोरी दूर होऊन, शरीराला त्याचा फायदा होतो.

अंडी : अंडीमध्ये आयरन, व्हिटामीन ए व प्रोटीनचे प्रमाण असते. दररोज एक अंडी खाल्ली तरी सुद्धा चांगली ऊर्जा मिळू शकते. सकाळच्या नाश्तामध्ये अंडीचे सेवन हे आवश्य करावे. त्यामुळे दिवसभर कोणतेही काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. 

Web Title: Increase in summer days Energies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.