किडनीची पॉवर वाढवण्यासाठी रोज खाणं सुरू करा ही टेस्टी चटणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 11:43 IST2025-02-07T11:42:40+5:302025-02-07T11:43:13+5:30
Chutney For Kidney health : खासकरून अनेकांना किडनीसंबंधी समस्या होत आहेत. यूरिक अॅसिड, किडनी स्टोन आणि इतर आजारांचा धोका वाढतो. अशात या समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपायही कामात येतात.

किडनीची पॉवर वाढवण्यासाठी रोज खाणं सुरू करा ही टेस्टी चटणी!
Chutney For Kidney health : खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, चुकीची लाइफस्टाईल, शरीराची हालचाल न करणं यामुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना लोकांना करावा लागत आहे. खासकरून अनेकांना किडनीसंबंधी समस्या होत आहेत. यूरिक अॅसिड, किडनी स्टोन आणि इतर आजारांचा धोका वाढतो. अशात या समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपायही कामात येतात. या समस्या दूर करण्यासाठी कोथिंबीर, पदीना, लसूण, आलं आणि लिंबू यांपासून तयार चटणी चांगला उपाय ठरू शकते. ही चटणी कशी तयार करावी आणि याचे फायदे का होतात हे जाणून घेऊ.
चटणी बनवण्यासाठी साहित्य
ही फायदेशीर चटणी बनवण्यासाठी १ कप कोथिंबीर, अर्धा कप पदीन्याची पानं, २ ते ३ लसणाच्या कळ्या, १ इंच आल्याचा तुकडा, १ चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा जिरे पावडर, काळं मीठ टेस्टनुसार आणि १ हिरवी मिरची.
कशी बनवाल?
मीठ सगळ्या गोष्टी चांगल्या धुवून मिक्सरमधून बारीक करा. याची चांगली पेस्ट तयार झाल्यावर त्यात मीठ टाका. नंतर ही चटणी एअर टाइट डब्यात स्टोर करून फ्रीजमध्ये ठेवा. ही चटणी रोज जेवणासोबत १ ते २ चमचे खाऊ शकता.
या चटणीचे फायदे
- या चटणीमधील डाययूरेटिक गुण यूरिक अॅसिड लघवीच्या माध्यमातून बाहेर काढण्यास मदत करतात.
- लिंबू आणि आले किडनी डिटॉक्स करण्यास मदत करतात.
- लसूण आणि आल्यामध्ये अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे सूज आणि वेदना कमी करतात.
- या चटणीमधील मसाल्यामुळे पचन तंत्र मजबूत राहण्यास मदत मिळते.