लहान मुलांला डायबेटिजचा वाढता धोका; टाळण्यासाठी करा 'हे' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 04:59 PM2021-05-21T16:59:07+5:302021-05-21T17:00:08+5:30

पालकांनो सावधान! गलेलठ्ठपणा बालकांमधील डायबेटिजही असू शकतो. मात्र या डायबेटिजवर आहार आणि जीवनशैलीत बदल करून नियंत्रण मिळवता येते. कसे ते वाचा...

Increased risk of diabetes in young children; Do 'this' remedy to avoid... | लहान मुलांला डायबेटिजचा वाढता धोका; टाळण्यासाठी करा 'हे' उपाय

लहान मुलांला डायबेटिजचा वाढता धोका; टाळण्यासाठी करा 'हे' उपाय

googlenewsNext

गलेलठ्ठ मूल म्हणजे सुदृढ आणि शरीरयष्टी कमी असलेले मूल म्हणजे अशक्त असा साधारण समज आहे. मात्र पालकांनो सावधान! हा गलेलठ्ठपणा बालकांमधील डायबेटिजही असू शकतो. मात्र या डायबेटिजवर आहार आणि जीवनशैलीत बदल करून नियंत्रण मिळवता येते.

ओबॅसिटी या जर्नलमध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या रिसर्चनुसार साखरेच्या अतिसेवनामुळे लहान मुलांमध्ये चयापचयाच्या समस्या वाढू लागतात. यासाठी वयवर्षे ९ ते १८ वयोगटातील मुलांची टेस्ट करण्यात आली. ज्या मुलांनी साखरेचे अतिसेवन केले होते, त्यांचा रक्तदाब जास्त असल्याचे आढळून आले. तसेच त्यांच्या रक्तात चरबीचे प्रमाणही जास्त होते. उलट ज्या मुलांनी साखरेचे नियंत्रित सेवन केले, त्या मुलांमध्ये रक्तदाबाची समस्या आढळून आली नाही आणि रक्तातील चरबीचे प्रमाणही कमी झाले.

लहान मुलांमधील मधुमेह टाळण्याचे उपाय

  • केक, बिस्किट, थंड पेय त्यांना देणे टाळा. त्याऐवजी नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेली फळे खा. उदाहरणार्थ: खजूर, केळी, द्राक्ष, लिची. या फळांमधून तुमच्या शरीरात साखर तर जाईलच. पण त्याचबरोबर शरीराला फायबरही मिळेल.
  • दर दोन तासांनी त्यांना खायला द्या. लक्षात ठेवा यामध्ये त्यांना प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ न देता घरी तयार केलेले पदार्थ खाऊ घाला. यात इडली, ढोकळा, दही आदी आंबवलेल्या पदार्थांचा समावेश करा. यामुळे गुड बॅक्टेरिया वाढतील आणि त्याचा फायदा तुमच्या लहानग्यांच्या शरीराला मिळेल. तसेच खाद्यपदार्थांचे पचन व्यवस्थित होईल व यकृतावर येणारा ताण कमी होईल.
  • प्रोटीन्स, ओमेगा-३ असलेले अन्नपदार्थ मुलांना जास्तीतजास्त देण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे मुलांच्या शरीरातून विषारी घटकांचा निचरा होईल.

Web Title: Increased risk of diabetes in young children; Do 'this' remedy to avoid...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.