ताणतणाव वाढलाय? 'या' पदार्थांचे सेवन देईल त्वरित आराम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 01:31 PM2021-07-11T13:31:16+5:302021-07-11T17:35:11+5:30

कित्येकदा तणावातच चुकीच्या सवयी किंवा व्यसन आत्मसात केले जातात. पण त्यांच्या आहारी न जाता काही खाद्य पदार्थ असे ही आहे जे तणावाला मात करण्यात फायदेशीर ठरू शकतात.

Increased stress? Consumption of 'these' foods will give instant relief. | ताणतणाव वाढलाय? 'या' पदार्थांचे सेवन देईल त्वरित आराम

ताणतणाव वाढलाय? 'या' पदार्थांचे सेवन देईल त्वरित आराम

Next

प्रत्येक जण कोणत्या न कोणत्या तणावाखाली जगत असतो. पण हा तणाव वाढला की त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. जसे एकाग्रता कमी होणे, चिडचिड होणे, भूक न लागणे किंवा जास्त खाणे. हाच तणाव योग्य पद्धतीने हातळला गेला नाही तर आजारांना निमंत्रण देतो. कित्येकदा तणावातच चुकीच्या सवयी किंवा व्यसन आत्मसात केले जातात. पण त्यांच्या आहारी न जाता काही खाद्य पदार्थ असे ही आहे जे तणावावर मात करण्यात फायदेशीर ठरू शकतात.


सुका मेवा: बदाम, काजू, मनुका, अक्रोड, खजूर किंवा शेंगदाणेही ताण कमी करायला मदत करतात. हे पदार्थ भरपूर प्रमाणात खायचे नाहीये. फक्त 2-2 बदाम/काजू/खजूर, एखादं अक्रोड पुरेसे होतील.

मायक्रोबायोटिक आहार: मेंदूला योग्य प्रमाणात ग्लूकोजचा पुरवठा आवश्यक असतो. पण ग्लूकोज म्हणजे डायरेक्ट साखर खाणे असे नाही. अशावेळी पॉलिश न केलेली धान्यं वापरली तर जास्त चांगले परिणाम होतात. ब्राउन राईस, गव्हाचं पीठ, भरडलेले धान्य, नाचणी, सातू, राजगिर्‍याचे पीठ वापरायला हवे.

केळं: त्वरित एनर्जी प्रदान करणारा हा फळ आपली मदत करतं. वजन वाढतं म्हणून केळी खाणे टाळणाले जाते. त्या लोकांसाठी हा सल्ला आहे की इतर जंक फूडसुद्धा लठ्ठपणासाठी जबाबदार असतात, त्यासाठी एवढ्या गुणकारी फळाला सोडणे योग्य नाही.

ए, बी, सी व्हिटॅमिनयुक्त आहार: ताण वाढल्यास अ, ब आणि क जीवनसत्त्व आहार घ्यावा. आपल्या आहारात भाज्या, फळे, दूध, डाळी, कडधान्य हे पदार्थ योग्य प्रमाणात सेवन करावेत.

टेन्शन वाढलं तरी हे टाळा:

  • कोल्ड ड्रिंक, चहा, कॉफीचे अतिरिक्त सेवन
  • जंक फूड खाणे
  • अती आहार घेणे
  • जेवण टाळणे
  • व्यसनाच्या आहारी जाणे
     

Web Title: Increased stress? Consumption of 'these' foods will give instant relief.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.