हिवाळ्यामध्ये वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 04:38 PM2018-10-27T16:38:39+5:302018-10-27T16:40:16+5:30

हिवाळा सुरू झाला की अनेक लोकांना वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.

increases weight due to winter in this know ways to control it | हिवाळ्यामध्ये वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा! 

हिवाळ्यामध्ये वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा! 

Next

(Image Credit : Laboratory Equipment)

हिवाळा सुरू झाला की अनेक लोकांना वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. असं म्हणतात की, या दिवसांमध्ये आपण जो आहार घेतो त्यामुळे वजन वाढतं. हे थोड्या प्रमाणात खरं असलं तरीदेखील याव्यतिरिक्त इतरही अनेक कारणं आहेत जी हिवाळ्यात वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात. जाणून घेऊयात हिवाळ्यामध्ये वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या कारणांबाबत आणि वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या उपायांबाबत...

'या' कारणांमुळे हिवाळ्यामध्ये वाढतं वजन :

1. व्यायाम न करणं

थंडीमध्ये उन्हाळ्यापेक्षा अधिक वेगाने वजन वाढतं. थंड वातावरणामुळे लोकं घरातून बाहेर पडण्याचा कंटाळा करतात. त्यामुळे शरीराचा वायाम होत नाही. याच कारणामुळे वजन वाढू लागतं. 

2. जास्त झोप घेणं

हिवाळ्यातील थंड वातावरणामुळे फार सुस्ती येते. त्याचप्रमाणे या दिवसांमध्ये दिवस छोटा आणि रात्र मोठी असून जास्त झोप घेतली जाते. त्याचप्रमाणे आपलं बॉडि सायकलही सुस्तीचं शिकार होतं. त्यामुळे वजन वाढतं. 

3. आपला आहार

हिवाळ्यात खूप भूक लागते, त्याचप्रमाणे शरीराला ऊब मिळेल अशा पदार्थांचा आहारात समावेश करण्यात येतो. या दिवसांमध्ये मसालेदार पदार्थ जास्त खाल्ले जातात. त्यामुळे शरीरातील फॅट्सचे प्रमाण वाढते. 

4. मेटाबॉलिझम वाढतं

मेटाबॉलिझम वाढल्याने वजन कमी होण्यास मदत होते पंरतु यामध्ये अचानक झालेल्या वाढिमुळे वजन कमी होण्याऐवजी वाढतं. 

5. थंडीमध्ये गोड पदार्थांचं सेवन 

उन्हाळ्याच्या तुलनेत थंडीमध्ये जास्त गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. त्यामुळे शरीराला अधिक कॅलरीज मिळतात आणि परिणामी वजन वाढते. 

वजन कंट्रोल करण्यासाठी काही टिप्स :

- हिवाळ्यामध्ये अधिकाधिक प्रोटिन असणाऱ्या पदार्थांचं सेवन करावं. 

- थोडा तरी व्यायाम करा. 

- वजन कंट्रोल करण्यासाठी आपल्या डाएटमध्ये फळं आणि भाज्यांचा समावेश करा. 

- अल्कोहोल, कार्बोहायड्रेट आणि हाय शुगर फूड्स खाणं टाळा. 

-हिवाळ्यामध्ये पार्टी सीझन सुरू होतो. परंतु, यादरम्यान आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवा.

- अधिकाधिक पाणी प्या. त्यामुळे शरीराला एनर्जी मिळते, तसेच कॅलरी बर्न करण्यासाठी मदत होते. 

Web Title: increases weight due to winter in this know ways to control it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.