Air pollution: भारतात अस्थमाच्या रूग्णांमध्ये वाढ; असा करा बचाव!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 01:32 PM2018-11-02T13:32:10+5:302018-11-02T13:37:13+5:30
सध्या भारतात दिल्लीसह अनेक शहरांमध्ये वायूप्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील हवा श्वास घेण्यासाठी अत्यंत घातक असून यामुळे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांसोबतच स्किन प्रॉब्लेम्स आणि श्वसनासंबंधी विकारांनी अनेक जण त्रस्त आहेत.
(Image Creadit : nycallergydoctor.com)
सध्या भारतात दिल्लीसह अनेक शहरांमध्ये वायूप्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील हवा श्वास घेण्यासाठी अत्यंत घातक असून यामुळे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांसोबतच स्किन प्रॉब्लेम्स आणि श्वसनासंबंधी विकारांनी अनेक जण त्रस्त आहेत. ग्लोबल स्टडीद्वारे करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये आणि विशेषतः भारत आणि चीन या देशांमध्ये अस्थमाच्या रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.
(Image Creadit : Down To Earth)
358 मिलियन लोक अस्थमाने ग्रस्त
युरोपमधील यॉर्क विश्वविद्यालयातील संशोधकांच्या मते, अस्थमा जगभरामधील सर्वात जुना आजार आहे. सध्या या आजाराने जवळपास 358 मिलियन लोक ग्रस्त झाले आहेत.
भारत-चीनमध्ये नियंत्रणाबाहेर परिस्थिती
संशोधकांचं असं म्हणणं आहे की, भारत आणि चीनसारख्या देशांमध्ये अस्थमावर नियंत्रण मिळवणं फार कठिण झालं आहे. यामागील एक कारणं म्हणजे या देशांची लोकसंख्या फार आहे. आणि दुसरं कारण म्हणजे येथे असणाऱ्या कारखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या धुरावर अजिबात नियंत्रण नाही.
मुख्य कारण : गाड्यांमधून बाहेर पडणारा धूर
जनरल एन्व्हायर्नमेंट हेल्थ परस्पेक्टिव (Journal Environmental Health Perspectives) यामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, गाड्यांमधून बाहेर पडणारा धूर प्रदूषण आणि अस्थमासारख्या अटॅकचं मुख्य कारण आहे. दरवर्षी 9 ते 23 मिलियन अस्थमाच्या रूग्णांना अस्थमाचा अटॅक ओझोन लेअरमध्ये वाढणाऱ्या प्रदूषणामुळे पडतो.
भारत-चीनच्या तुलनेत अमेरिकेमधील हवा शुद्ध
दक्षिण आणि पूर्व आशियाई देशांमध्ये विशेषतः भारत आणि चीनमध्ये प्रदूषित हवेमुळे अस्थमाच्या रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. तर अमेरिकेची हवा दक्षिण आणि पूर्व आशियाई देशांच्या तुलनेत शुद्ध आहे.
गाड्यांवर नियंत्रण ठेवल्याने अस्थमा कमी होण्यास मदत
अमेरिकेमध्ये कोलोराडो बोल्डर आणि नासा विश्वविद्यालयातील संशोधकांचं असं म्हणणं आहे की, प्रदूषण कमी करण्याचा एक उपाय म्हणजे, गाड्यांवर प्रतिबंध घालणं हा आहे. त्यामुळे हवा प्रदूषित होण्याचं प्रमाण कमी होऊन फक्त अस्थमाच नाही तर श्वसनासंबंधातील रोगांवर नियंत्रण मिळवण्यासही मदत होते.
(Image Creadit : ChinaFilem)
असा करा बचाव :
वायू प्रदूषणापासून पूर्णपणे बचाव करणं अशक्य आहे. परंतु काही गोष्टी लक्षात घेऊन यापासून होणाऱ्या समस्या काही प्रमाणात टाळू शकतो.
1. घरातून बाहेर जात असताना तोंडावर मास्क लावा.
2. डोळ्यांवर चश्मा लावून ड्रायविंग करा, त्यामुळे डोळ्यांना होणारा त्रास कमी होतो.
3.घरातून बाहेर असताना चेहऱ्याच्या त्वचेला सतत हात लावू नका.
4 . स्ट्रिट फूड खाणं कटाक्षाने टाळा.
5. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जाणं टाळा.
6. भरपूर पाणी प्या. शरीरामध्ये पाण्याची कमतरता होऊ देऊ नका.