उन्हाळ्यात ब्लड प्रेशर वाढल्यास जीवाला होऊ शकतो धोका, 'असं' करा कंट्रोल!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 11:11 AM2019-04-16T11:11:51+5:302019-04-16T11:18:20+5:30
हाय बीपी म्हणजे उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर मानलं जातं. याने शरीराचं कोणताही अवयव प्रभावित होऊ शकतो.
हाय बीपी म्हणजे उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर मानलं जातं. याने शरीराचं कोणताही अवयव प्रभावित होऊ शकतो. खासकरुन उन्हाळ्यात ही समस्या अधिक धोकादायक ठरु शकते. इतकी की, यात व्यक्तीचा जीव सुद्धा जाऊ शकतो. चला जाणून घेऊ याबाबतच्या काही गोष्टी.
सायलेंट किलर हाय बीपी
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, जगभरात दरवर्षी हाय ब्लड प्रेशरमुळे ७० लाख लोकांचा मृत्यू होतो. जगातला जवळपास प्रत्येक तिसरा व्यक्ती याने प्रभावित आहे. अशी शंका व्यक्त केली जात आहे की, २०२५ पर्यंत जगात १.५ बिलियनपेक्षा जास्त लोकांना हाय ब्लडप्रेशर होऊ शकतो. याने डोळ्यांची दृष्टी जाऊ शकते, किडनीच्या रक्तवाहिन्या लहान-मोठ्या होऊ शकतात, हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोकचा ही धोका होऊ शकतो.
उकाड्यात जास्त धोका
(Image Credit : patrika.com)
ज्या लोकांचा बीपी अधिक असतो त्यांनी गरमीत फार राहू नये. फार जास्त उन्हात राहिल्याने आणि डिहायड्रेशनच्या कारणाने याचा धोका अधिक जास्त वाढतो. डोकेदुखी, चक्कर आल्याने व्यक्ती इतकी कमजोर होतात की, ते काही सांगूही शकत नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला हाय बीपी असलेल्या व्यक्तीने उन्हाळ्यात अधिक काळजी घ्यावी.
वापरा या टिप्स
मीठ कमी खावे - मिठामुळे ब्लड प्रेशर अधिक वाढतं. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं आहे की, ज्यांना हाय बीपी आहे त्यांनी या दिवसात मीठ कमी खावे.
कांदा - नियमीतपणे कांदा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहतो. यात क्योरसेटिन असतं. हे एक असं ऑक्सिडेंट फ्लेवेनॉल आहे, ज्याने हृदयरोगापासून बचाव होतो.
लसूण - लसणामध्ये एलिसीन असतं, जे नायट्रिक ऑक्साइडचे उत्पादन वाढवतं आणि मांसपेशीला आराम मिळतो. ब्लड प्रेशरच्या डायलोस्टिक आणि सिस्टोलिक सिस्टीममध्ये आराम मिळतो. हेच कारण आहे की, ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी रोज रिकाम्या पोटी एक लसणाची कळी खावी.
ब्राऊन राइस - ब्राउन राइसचा वापर करा. यात मीठ, कोलेस्ट्रोल आणि चरबीचं प्रमाण कमी असतं. हा राइस हाय ब्लड प्रेशर असलेल्यांसाठी फार फायदेशीर ठरतो.
रक्त घट्ट होऊ देऊ नका - लसूण ब्लड प्रेशरची समस्या दूर करण्यासाठी चांगला घरगुती उपाय मानला जातो. याने रक्त घट्ट होत नाही. रक्तात जर जास्त कोलेस्ट्रॉल झालं तर याने दूर केलं जातं. हाय ब्लड प्रेशरचं एक मुख्य कारण म्हणजे रक्त घट्ट होणं किंवा रक्ताच्या गाठी होणं. रक्त घट्ट झाल्याने रक्तप्रवाह हळू होतो. याने नसांवर दबाव पडतो.
मूळा - तसा तर मूळा एक सामान्य भाजी आहे. पण मूळा खाल्ल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. मूळा शिजवून किंवा कच्चा खाल्ल्याने शरीराला मिनरल्स आणि पोटॅशिअम मिळतात. त्यामुळे मूळ नियमित खावा.
(टिप - वरील लेखातील मुद्दे केवळ माहितीसाठी वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातील कोणत्याही गोष्टीचा आम्ही दावा करत नाही. काहीही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)