सूर्यनमस्कार करण्याचे नेमके काय आहेत फायदे?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 10:53 AM2018-04-17T10:53:24+5:302018-04-17T10:53:24+5:30
अनेक कार्यक्रमांमध्येही सूर्यनमस्काराचे फायदे सांगितले जातात. पण अनेकांचा सूर्यनमस्काराने बॉडी बनते असाच समज असतो.
अनेकांना व्यायाम करणा-यांना आपण सूर्यनमस्कार करताना बघत असतो. अनेक कार्यक्रमांमध्येही सूर्यनमस्काराचे फायदे सांगितले जातात. पण अनेकांचा सूर्यनमस्काराने बॉडी बनते असाच समज असतो. मुळात त्याचे नेमके फायदेच अनेकांना माहिती नसतात. त्यामुळे सूर्यनमस्काराचे नेमके काय फायदे होतात, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सूर्यनमस्कार आणि योगा यामुळे संपूर्ण शरिर निरोगी आणि तेजस्वी राहतं. सूर्यनमस्कार लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी लाभदायक आहे. दररोज सूर्यनमस्कार केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात तसेच आरोग्याशी संबंधीत समस्या टाळता येतात.
सूर्यनमस्कार 12 योगासनं मिळून बनला आहे. हे योगासन खूपच सोप्या पद्धतीने करता येऊ शकतात. शास्त्रांनुसार, सूर्य नमस्कार करण्याचे आरोग्यास अनेक फायदे होतात. चला तर मग पाहूयात सुर्य नमस्कार करण्याचे आरोग्यदायी फायदे…
उन्हात उभे राहून सूर्यनमस्कार घातले तर ‘ड’ जीवनसत्त्व शरीराला मिळते.
सूर्यनमस्काराने चेह-यावर तेज येतं आणि चेहरा आणखी खुलतो.
शरीर लवचिक होणे, चरबी कमी होणे, रोगप्रतिकारशक्ती वाढणे
दररोज सूर्यनमस्कार केल्यास संपूर्ण शरीराचे मसल्स मजबूत आणि लवचिक होतात.
छातीचे स्नायू बळकट होतात व श्वसन संस्थेसाठी उपयुक्त...
पायाचे स्नायू बळकट होऊन पाठीचा कणा, मानेचे स्नायू लवचिक होतात.
सूर्यनमस्कारामुळे ऑक्सिजन भरपूर प्रमाणात रक्तात पोहोचतं.
शरीराचे ब्लड सर्क्युलेशन सुधारते.
स्थूलपणा, हृदयविकार, मधुमेह व उच्च रक्तदाब या सर्व आजारांपासून बचाव करण्यासाठी सूर्यनमस्कार उपयोगी ठरतात.
कंबर व पाठीचा कणा लवचिक होतो. स्नायू बळकट होतात व यकृतासारख्या पोटातील अवयवांसाठी उपयुक्त.
पाठीचा कणा लवचिक होतो. स्नायू मजबूत होतात व कंबर लवचिक होते.
सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. सर्व यौगिक अभ्यासासाठी सूर्योदयाची वेळ सर्वोत्तम मानली गेली आहे. त्याचप्रमाणे सूर्य नमस्कारसुद्धा सूर्योदयाच्या वेळी घालणे हितकारक आहे. उघड्यावर हवेशीर जागेवर रिकाम्या पोटी सूर्यनमस्कार घालावेत. मन शांत आणि प्रसन्न असल्यावर सर्व योगाभ्यासाचा आपणावर विशेष परिणाम होतो, असे म्हणतात.