कोरोनाचा संसर्ग पुन्हा होणार? महाराष्ट्रातील 'या' शहरात Reinfection चे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 06:56 PM2020-10-14T18:56:06+5:302020-10-14T19:51:38+5:30
CoronaVirus News & Latest Updates : लॅसेंट या वैद्यकिय नियतकालिकात कोरोनाच्या संक्रमणाबाबत हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.
कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर बरा झालेल्या व्यक्तीला पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का असा प्रश्न अनेकांना पडतो. गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रसार कमी होण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही महिन्यापासून कोरोनाच्या प्रसाराबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. आता भारतात कोरोनाचं रिइंफेक्शन म्हणजेच पुन्हा संसर्ग होण्याचे तीन संशयित रुग्ण समोर आले आहेत. त्यातही धक्कादायक म्हणजे पुन्हा होणारा कोरोनाचा संसर्ग गंभीर असल्याचं एका संशोधनात समोर आलं आहे.
पुन्हा कोरोनाचं संक्रमण झालेली दोन रुग्ण मुंबईत तर एक रुग्ण अहमदाबादमध्ये आढळून आला आहे. आयसीएमआरने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. लॅसेंट या वैद्यकिय नियतकालीकात कोरोनाच्या संक्रमणाबाबत हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. कोरोनाचा पुन्हा संसर्ग होऊ शकतो आणि त्याची लक्षणं अधिक गंभीर होतात असं या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.
युएसच्या नेवाडातील २५ वर्षीय तरूणाला कोणताही आजार नव्हता. एप्रिलमध्ये कोरोनाचं संक्रमण झालं होतं. क्वारंटाईनमध्ये या तरूणाची स्थिती चांगली झाली. त्या व्यक्तीच्या दोन आरटी-पीसीआर टेस्ट नेगेटिव्ह आल्या. मात्र ४८ दिवसांनंतर ती व्यक्ती पुन्हा पॉझिटिव्ह असल्याचं दिसून आलं. दुसऱ्यांदा कोरोनाचं संक्रमण झाल्यानंतर त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. ऑक्सिजन सपोर्टची आवश्यकता भासल्याचे या रिपोर्टमध्ये दिसून आलं आहे. १ नंबर जोडपं! व्हायरल झालेल्या 'Baba Ka Dhaba' च्या रडणाऱ्या आजोबांची लव्हस्टोरी माहित्येय का?
रिइन्फेक्शन किती दिवसांनी होतं. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं कोणतीही माहिती दिलेली नाही, असं आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव यांनी सांगितले. संशोधक अनंत भान यांनी दिलेल्या माहितीनुसार, '' कोरोना संसर्गातून बाहेर आल्यानंतर पुन्हा संसर्ग होत असेल तर रोगप्रतिकारकशक्ती कालावधीसाठी राहते असा प्रश्न उपस्थित होतो. म्हणून हर्ड इम्युनिटीसाठी नैसर्गिक इम्युनिटीवर अवलंबून राहण्याऐवजी लसच सुरक्षित आहे," कोरोनाने होणारे मृत्यू आणि डायबिटीस, कॅन्सर, हायपरटेंशन या आजारांचा संबंध कसा?; जाणून घ्या