काळजी वाढली! हर्ड इम्युनिटीपासून भारत अजूनही खूप दूर; आरोग्यमंत्र्यांचा इशारा 

By manali.bagul | Published: September 28, 2020 03:30 PM2020-09-28T15:30:33+5:302020-09-28T15:43:00+5:30

CoronaVirus News & Latest Updates : हर्ड इम्यूनिटी डेव्हलप करण्यासाठी अजूनही खूप वेळ लागू शकतो. म्हणून बेसावध राहण्यापेक्षा कोरोना व्हायरसशी निगडीत महत्वाच्या नियमांचे पालन करायलाच हवे. 

India far from any kind of herd immunity against corona virus say health minister | काळजी वाढली! हर्ड इम्युनिटीपासून भारत अजूनही खूप दूर; आरोग्यमंत्र्यांचा इशारा 

काळजी वाढली! हर्ड इम्युनिटीपासून भारत अजूनही खूप दूर; आरोग्यमंत्र्यांचा इशारा 

Next

देशात कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्याही सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल 60 लाखांचा टप्पा पार केला आहे.आयसीएमआरकडून  करण्यात आलेल्या राष्ट्रव्यापी सीरो सर्वेनुसार Sars-CoV-2 विरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती विकसित करण्यासाठी भारतातील लोकसंख्येला वेळ लागू शकतो.  याबाबत आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रविवारी माहिती दिली आहे. मे मध्ये करण्यात आलेल्या सिरो सर्वेक्षणाच्या रिपोर्टनुसार देशातील फक्त 0.73%  लोकसंख्येत कोरोनाचा प्रसार झाल्याची माहिती समोर आली होती. 

सोशल मीडिया युजर्सच्या प्रश्नांना उत्तर देताना आरोग्यमंत्री यांनी  सांगितले की, ''दुसऱ्या सीरो सर्वेच्या माध्यमातून  असे संकेत मिळाले आहेत. की, हर्ड इम्यूनिटी विकसित करण्यासाठी अजूनही खूप वेळ लागू शकतो. म्हणून बेसावध राहण्यापेक्षा कोरोना व्हायरसशी निगडीत महत्वाच्या नियमांचे पालन करायलाच हवे. 
हर्ड इम्युनिटी अप्रयत्यक्ष स्वरुपात एका मोठ्या लोकसंख्येसाठी एक सुरक्षा कवचाप्रमाणे आहे. ज्यामुळे लोकांमध्ये नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

जल्द आएगी सीरो सर्वे की दूसरी रिपोर्ट

पण हे तेव्हाच होऊ शकतं. ज्यावेळी लोकसंख्येचा मोठा भाग या आजारानं संक्रमित होऊन रोगप्रतिकारकशक्ती विकसित  होते. 'संडे संवाद' दरम्यान आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, दुसऱ्या सिरो सर्वेचा रिपोर्ट लवकरात लवकर प्रकाशित केला जाणार आहे. सीरो सर्वेसाठी रक्ताचे नमुने आणि एलजीएम (Immunoglobulin G) एंटीबॉडीज चाचणी केली जाते. त्यातून इंन्फेक्शन व्हायरसमुळे झाले होते का हे पाहिलं जातं.

ऑगस्ट महिन्याच्या शेवटापासून सप्टेंबरच्या सुरूवातीपर्यंत जवळपास  २१ राज्यांमध्ये  ७० जिल्ह्यांतील तब्बल २४  हजार नमुन्यांची तपासणी करण्यात आली. आजार हा कम्युनिटी ट्रांसमिशनच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे का? हे पाहण्यासाठी  सिरो सर्वे महत्वाचा असतो. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थचे प्राध्यापक डॉ. गिरिधर बाबू यांनी दिलेल्या माहितीनुसार हर्ड इम्युनिटीपासून आपण दूर आहोत.  हर्ड इम्युनिटी मिळवण्यासाठी घाई करणं योग्य ठरणार नाही. 

 इंजेक्शनच्या तुलनेत काद्वारे दिली जाणार कोरोनाची लस ठरते प्रभावी

या लसीला नेझल स्प्रे किंवा इंट्रानेजल वॅक्सिन असं म्हणतात. कोरोना व्हायरस अनेकदा नाकाद्वारे शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे नाकाद्वारे  दिली जाणारी लस व्हायरसला शरीरात प्रवेश करण्यापासून रोखू  शकते. याशिवाय मोठ्या प्रमाणात उत्पादन करणं तुलनेनं सोपं असतं. आज आम्ही तुम्हाला नाकतून दिल्या जात असलेल्या कोरोनाच्या लसीबाबत अधिक माहिती देणार आहोत. फायनेंशियल एक्सप्रेसमध्ये या संदर्भातील रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला होता.  

 उंदरांच्या एका गटाला इंजेक्शनचा वापर करून लस दिली होती.  त्यानंतर SARS-CoV-2 ने संक्रमित केल्यानंतर फुफ्फुसांमध्ये व्हायरसचं संक्रमण दिसलं नाही. पण व्हायरल आरएनएचा काही भाग दिसून आला होता. तुलनेनं ज्या उंदंरांना नाकाद्वारे लस देण्यात आली होती.  त्यांच्या फुफ्फुसांमध्ये व्हायरल आरएनए नव्हते. या अभ्यासातून दिसून आलं की,  नेजल स्प्रे लस IgC आणि म्यूकोसल IgA डिफेंर्सलाही वाढवण्यास मदत करते. त्यामुळे अशी लस परिणामकारक ठरते.

नेजल स्प्रे लस तुमच्या रोगप्रतिकारकशक्तीला रक्त आणि नाकाला प्रोटिन्स तयार करण्यासाठी मजबूत बनवते. या लसीचा वापर करताना डॉक्टर नाकात स्प्रे करतात आणि त्यानंतर दोन आठवड्यांनी या लसीचा परिणाम दिसायला सुरूवात होते. नाकाद्वारे दिल्या जात असलेल्या लसीने नेझल स्प्रे म्यूकोसल उघडले जातात. त्यानंतर धमन्या किंवा रक्त वाहिन्यांद्वारे संपूर्ण शरीरात लस पोहोचते. नेजल आणि ओरल लस विकसित करणारे तंत्र कमी प्रमाणात आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठी नेझल स्प्रे लस कितपत परिणामकारक ठरेल हे येत्या काळात समजू शकेल. 

हे पण वाचा-

काळजी वाढली! कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा

कोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे?, जाणून  घ्या

खुशखबर! जॉनसन अ‍ॅण्ड जॉनसनची लस शेवटच्या टप्प्यात; ६० हजार लोकांवर चाचणी होणार

वाढत्या संक्रमणात कोरोनाच्या कोणत्या लक्षणांना गांभीर्याने घ्यायचं?; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

'कोणतीही कोरोना लस यशस्वी ठरण्याची गॅरेंटी नाही'; WHO च्या प्रमुखांचे धक्कादायक विधान

Web Title: India far from any kind of herd immunity against corona virus say health minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.