लिव्हरच्या 'या' गंभीर आजाराचे रोज हजारो लोक होत आहेत शिकार, जाणून घ्या कारणे...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 12:22 PM2024-04-18T12:22:12+5:302024-04-18T12:23:21+5:30
Hepatitis Cases In India: रिपोर्टमध्ये सांगण्यात आल की, हेपेटायटिसमुळे रोज जगभरात तीन हजार लोकांचा मृत्यू होत आहे तर 6 हजारांपेक्षा जास्त लोक याचे शिकार होतात.
Hepatitis Cases In India: आजकाल जगभरात लिव्हरसंबंधी वेगवेगळे आजार लोकांमध्ये वाढत आहेत. लिव्हरच्या वेगवेगळ्या आजारांपैकी एक गंभीर आजार म्हणजे हेपेटायटिस. दरवर्षी भारतात हेपेटायटिस आजाराचे हजारो रूग्ण आढळतात. नुकताच 'वर्ल्ड हेपेटायटिस रिपोर्ट 2024' च्या प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये हेपेटायटिस आजार आणि त्यासंबंधी अनेक गंभीर गोष्टी समोर आल्या आहेत. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आल की, हेपेटायटिसमुळे रोज जगभरात तीन हजार लोकांचा मृत्यू होत आहे तर 6 हजारांपेक्षा जास्त लोक याचे शिकार होतात.
काय आहे हा आजार?
हेपेटायटिस लिव्हरसंबंधी आजार आहे. जो मुख्यपणे वायरल इन्फेक्शनमुळे होतो. या आजारात लिव्हरवर सूज येऊ लागते. एक्सपर्ट्सनुसार, हेपेटायटिस हा आजार 5 प्रकारच्या वायरसच्या आधारावर ओळखली जाते. याना हेपेटायटिस ए, बी, सी, डी आणि ई म्हणून ओळखलं जातं. आकडेवारीनुसार, जगभरात दरवर्षी हेपेटायटिसने जवळपास 13 लाख लोकांचा मृत्यू होतो.
3 वर्षात वाढले मृत्यू
रिपोर्टच्या आकडेवारीनुसार, 2019 मध्ये वायरल हेपेटायटिसने 11 लाख लोकांचा जीव गेला होता. तेच 2022 मध्ये 18 टक्क्यांनी वाढ झाली. 2022 मध्ये 13 लाख लोकांचा जीव या आजारामुळे गेला. यातील जवळपास 83 टक्के मृत्यू हे हेपेटायटिस बी मुळे झालीत. तसेच 17 टक्के केसेसमध्ये रूग्ण हेपेटायटिस सी ने पीडित होते. 2022 मध्ये 25.4 कोटी लोक हेपेटायटिस बी आजाराने ग्रस्त आढळले.
या रिपोर्टमधून समोर आलं आहे की, कमी वयातही लोकांना हेपेटायटिस आजार होण्याचं प्रमाणही अधिक आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, हेपेटायटिस बी आणि हेपेटायटिस सी आजाराने गंभीर रूपाने संक्रमित 50 टक्क्यांपेक्षा अधिक लोकांचं वय 30 ते 54 होतं. यात 12 टक्के रूग्ण लहान मुले होती. तर 58 टक्के रूग्ण वयस्क पुरूष होते.
भारतात सगळ्यात जास्त केसेस
हेपेटायटिसने सगळ्यात जास्त प्रभावित 10 देशांच्या यादीत भारताचं नावही बरंच वर आहे. या देशांमध्ये चीन, भारत, फिलीपींस, इंडोनेशिया, नायजेरिया, पाकिस्तान, व्हिएतनाम आणि रशिया यांचा समावेश आहे. आकडेवारीनुसार, जागतिक स्तरावर हेपेटायटिस बी आणि सी चे सगळ्यात जास्त रूग्ण चीनमध्ये आढळतात. तर दुसऱ्या स्थानावर भारताचं नाव आहे. देशात 2022 मध्ये हेपेटायटिस बी आणि सी चे 3.53 कोटी केसेस आढळल्या.
हेपेटायटिसची लक्षणे
- त्वचेवर पिवळेपणा
- डोळे पिवळे दिसणं
- नखांचा रंग पिवळा होणं
- सतत थकवा
- फ्लूसारखी लक्षण
- डार्क पिवळ्या रंगाची लघवी येणं
- डार्क पिवळ्या रंगाची विष्ठा येणं
- पोटदुखी
- भूक कमी लागणं
- अचानक वजन कमी होणं
कसा कराल बचाव?
हेपेटायटिस फारच घातक ठरू शकतो. त्यामुळे याचा धोका टाळणं फार गरजेचं आहे. जर असं केलं नाही तर जीव गमवावा लागू शकतो. चला जाणून घेऊ बचावाचे उपाय....
1) वॅक्सीन घ्या
हेपेटायटिसपासून बचावासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे आपल्या मुलांना बालपणीच यासंबंधी वॅक्सीन लावा. असं केल्याने हेपेटायटिसचा धोका बराच कमी होतो. पण अजूनही हेपेटायटिस सी आणि ई साठी वॅक्सीन आलेली नाही.
2) व्हायरसपासून बचाव
हेपेटायटिसच्या व्हायरसचं संक्रमण तेव्हा पसरतं जेव्हा एका व्यक्तीच्या शरीरातील फ्यूइड दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात कसंतरी जातं. अशात ज्यांना हा आजार आहे त्यांच्यापासून अंतर ठेवा. यात रेजर, निडल, ब्रश, ब्लडपासून बचाव करणं या गोष्टींचा समावेश आहे.
3) दुषित पाणी आणि अन्न
नेहमी घरातील स्वच्छ पाण्याचं आणि अन्नाचं सेवन करा. बाहेरचे पदार्थ जास्त खाल तर तुम्ही हेपेटायटिसचे शिकार होऊ शकतात.