कोरोना लढाईत जलदगतीने उपचार?; अतिगंभीर रुग्णांना लस देण्याचा केंद्राचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 12:39 PM2020-09-14T12:39:07+5:302020-09-14T12:40:19+5:30

सुरक्षित कोरोना लसीबाबत शाश्वती असल्यास फास्ट ट्रॅक लस म्हणजेच आपातकालीन स्थितीत गंभीर स्वरुपात कोरोनापिडीत असलेल्या रुग्णांना लस देता येऊ शकते. 

India looking for emergency authorisation of corona virus vaccine as covid-19 cases | कोरोना लढाईत जलदगतीने उपचार?; अतिगंभीर रुग्णांना लस देण्याचा केंद्राचा विचार

कोरोना लढाईत जलदगतीने उपचार?; अतिगंभीर रुग्णांना लस देण्याचा केंद्राचा विचार

Next

भारतात कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. अशा स्थितीत सरकारकडून वयस्कर आणि गंभीर स्थितीतील कोरोना रुग्णांना आपातकालिन स्थितीत कोविड १९ ची लस दिली जावी असा विचार सुरू आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी संडे संवाद दरम्यान आपलं मत मांडत असताना लस देण्यबाबत उल्लेख केला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लसीच्या चाचणीचा शेवटचा टप्पा पूर्ण होईपर्यंत सहा ते नऊ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. अशात  प्रभावशाली आणि सुरक्षित कोरोना लसीबाबत शाश्वती असल्यास फास्ट ट्रॅक लस म्हणजेच आपातकालीन स्थितीत गंभीर स्वरुपात कोरोनापिडीत असलेल्या रुग्णांना लस देता येऊ शकते. 

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितले की, ''भारतातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनं ४८ लाखांचा टप्पा पार केला असून  अमेरिकेनंतर आणि दुसरा क्रमांक भारताचा. ऑगस्टच्या मध्यात भारतात अमेरिकेपेक्षाही जास्त रुग्णांची नोंद झाली होती. तर या महिन्यात कोरोनामुळे १ हजारापेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. हर्षवर्धन यांनी सांगितले की फास्ट ट्रॅक्ट लसीच्या मदतीनं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी लागणारा वेळ वाचवता येऊ शकतो. पण तरीही कोणत्याही लसीची चाचणी अपूरी  सोडून चालणार नाही. सरकारद्वारे  सुरक्षितता आणि परिणामकारकतेची तपासणी केल्यानंतरच लोकांसाठी लस उपलब्ध करून दिली जाईल. ''

पुढे त्यांनी सांगितले की, ''लसीबाबत साशंकता असल्यास लसीचा पहिला डोस मी स्वतः घेईन. भारतासह जगभरातील देशांमध्ये कोरोनाच्या लसीवर काम सुरू आहे. कोणती लस परिणामकारक ठरेल याबाबत कोणतीही माहिती देता येत नाही. लस तयार झाल्यानंतर सगळ्यात जास्त  गरज असलेल्या व्यक्तींना आधी दिली जाणार आहे. आरोग्य कर्मचारी, वयस्कर लोक, कमी रोगप्रतिकारकशक्ती असलेले लोक, गंभीर आजारांनी पिडीत असलेल्यांना लस देण्यासाठी प्राध्यान्य दिलं जाणार आहे.  साधारणपणे  २०२१ च्या महिन्याच्या तीन महिन्यात जगभरात  अनेक लसींच्या चाचण्या पूर्ण झालेल्या असतील. ''

बुजुर्ग-ज्यादा बीमार लोगों को इमरजेंसी में वैक्सीन देने पर विचार

कोरोनाच्या उद्रेकात रशिया 'या' देशाला सर्वात आधी ५ कोटी लसीचे डोस पुरवणार 

रशियानं ब्राझिलला लसीचे ५ कोटी डोज पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. rt.com मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडानं सांगितले की नोव्हेंबरमध्ये स्पुतनीक व्ही  या लसीचे वितरण सुरू होणार आहे. ब्राझिलकडून आता अंतिम मंजूरी येणं बाकी आहे. 

कोरोना व्हायरसनं सगळ्यात जास्त प्रभावी असलेल्या देशांपैकी एकहेत. त्यापैकी 131,274 लोकांचा मृत्यू झाला आहे.  जास्त मृतांच्या संख्येत अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. एकूण संक्रमित रुग्णसंख्येमध्ये अमेरिका आणि भारतानंतर ब्राझिलचा क्रमांक येतो. रशियानं कोरोना लसीच्या कोट्यावधी डोजसाठी ब्राझिलमधील अनेक राज्यांशी करार केला आहे.

आता राष्ट्रीय स्तरावर ब्राझिल रशियाशी करार करेल अशी आशा अनेकांना आहे. अनेक देशांकडून  स्पुतनिक व्ही या लसीवर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे पुन्हा राष्ट्रपतींकडून सांगण्यात आले.  रशियानं दिलेल्या माहितीनुसा लस तयार करण्यासाठी आतापर्यंत आधारभूत संरचना पहिल्यापासूनच तयार होती. त्यामुळे कमी वेळात लस तयार करणं शक्य झालं.  RDIF नं दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची लस लॉन्च केल्यापासून वेगवेगळ्या देशातून मागणीला सुरूवात झाली आहे. वेगवेगळ्या देशांतून आतापर्यंत अरबो डोसची ऑर्डर मिळाली आहे. 

हे पण वाचा-

काळजी वाढली! २०२१ च्या अखेरपर्यंत आहे तशीच राहणार परिस्थिती; प्रसिद्ध कोरोना तज्ज्ञांचा दावा

कच्चा कांदा खाण्याचे 'हे' फायदे वाचाल; तर जेवताना रोजच आवडीनं कांदा  खाल

Web Title: India looking for emergency authorisation of corona virus vaccine as covid-19 cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.