दिलासादायक! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला वेगळं करणारा भारत जगातील पहिला देश; : ICMR
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 09:31 AM2021-01-03T09:31:41+5:302021-01-03T09:34:23+5:30
CoronaVirus News & Latest updates : भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) ने शनिवारी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
कोरोनाच्या माहामारीत काही दिवसांपूर्वी पसरलेल्या नव्या स्ट्रेनमुळे पुन्हा चिंतेचं वातावरण तयार झालं होतं. कारण कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन अधिक संक्रामक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात होते. भारताने ब्रिटनमध्ये पसरलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर माहिती मिळवण्याबाबत मोठं यश मिळवलं आहे. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) ने शनिवारी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
आयसीएमआरने ट्विट करून दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये समोर आलेला कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनवर भारतानं यशस्वीरित्या कल्चर केले आहे. कल्चर एक अशी प्रक्रिया आहे. ज्यात पेशींना नियंत्रित स्थितीत वाढवलं जातं. साधारणपणे त्यांच्या प्राकृतीक वातावरणासाठी बाहेर अशी स्थिती निर्माण केली जाते.
आयसीएमने दिलेल्या माहितीनुसार जगभरातील इतर देशांपैकी भारताला सगळ्यात आधी ही माहिती मिळवण्यात यश मिळवलं आहे.
India successfully cultures the new viral strain on the horizon (UK-variant of SARS-CoV-2). #ICMRFIGHTSCOVID19#IndiaFightsCOVID19#CoronaUpdatesInIndia#COVID19#Unite2FightCorona@MoHFW_INDIA@PIB_India@DrHVoffice@drharshvardhan@AshwiniKChoubey@icmr_nivpic.twitter.com/vaCMQMSHOJ
— ICMR (@ICMRDELHI) January 2, 2021
आयसीएमआरने आपल्या ट्विटमध्ये दावा केला आहे की, कोणत्याही देशानं ब्रिटनमध्ये सापडून आलेल्या नवीन कोरोना स्ट्रेनचे विश्लेषण केलेले नाही. ब्रिटनमध्ये समोर आलेल्या व्हायरसच्या प्रकारांना राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्थान (NIV)ने यशस्वीरित्या वेगळं करून विश्लेषण केलं आहे. या प्रक्रियेसाठी ब्रिटनवरून आलेल्या लोकांमधून नमूने एकत्र करण्यात आले होते.
भारतात कोरोना व्हायरसनं २९ लोक संक्रमित
कोरोनाचा नवीन स्ट्रेन ७० टक्के अधिक संक्रामक असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे आतापर्यंत २९ लोकांना संक्रमित केलं असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान नव्या स्ट्रेनच्या तुलनेत कोविडचा जुना स्ट्रेन जास्त धोकादायक आहे. ज्यात सर्वात जास्त जीव गेले आहेत. एका रिसर्चमधून याचा खुलासा झाला आहे. काळजी वाढली! हिवाळ्यात दारूचं सेवन ठरू शकतं जीवघेणं; हवामान विभागाचा धोक्याचा इशारा
ब्रिटनमध्ये पब्लिक हेल्थ एजन्सी द्वारे करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये आढळून आले की, जुन्या स्ट्रेन जास्तीत जास्त रूग्णांना भरती तर करावंच लागलं, सोबतच जुन्या स्ट्रेनने मृत्यूही जास्त झालेत. त्यामुळे एक्सपर्टचं असं मत आहे की, नव्या स्ट्रेनबाबत टेंशन घेण्याचं काहीच कारण नाही. हा भलेही जुन्या स्ट्रेनच्या तुलनेत अधिक वेगाने संक्रामक आहे. पण जीवघेणा नाही. आधीपेक्षा जास्त जीवघेणा ठरणार कोरोनाचा नवा स्ट्रेन? संशोधनातून समोर आली महत्वाची माहिती