कौतुकास्पद! भारतीय वंशाच्या १४ वर्षांच्या पोरीनं शोधला कोरोनाचा उपाय, अन् मिळवले १८ लाख

By manali.bagul | Published: October 19, 2020 12:48 PM2020-10-19T12:48:47+5:302020-10-19T13:09:37+5:30

CoronaVirus Positive News & Latest Updates: भारतीय वंशाच्या 14 वर्षीय अनिका चेब्रोलूने या तरूणीने  2020 3M आव्हान पूर्ण करत 25 हजार डॉलर म्हणजेच 18 लाख 35 हजार 375 रुपयांचे बक्षीस जिंकले आहे.

Indian american 14 year old scientist discover cure covid-19 won 25 thousand dollar prize | कौतुकास्पद! भारतीय वंशाच्या १४ वर्षांच्या पोरीनं शोधला कोरोनाचा उपाय, अन् मिळवले १८ लाख

कौतुकास्पद! भारतीय वंशाच्या १४ वर्षांच्या पोरीनं शोधला कोरोनाचा उपाय, अन् मिळवले १८ लाख

Next

 कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात कहर केला आहे. कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत असतानात जगभरातील अनेक देशातील शास्त्रज्ञ कोरोनाची लस आणि औषधं शोधण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. दरम्यान भारतासाठी अभिमानास्पद आणि सकारात्मक ठरणारी बातमी समोर येत आहे. एका 14 वर्षीय मुलीने आपल्या हुशारीने कोरोनाला हरणवण्याचा उपाय शोधला आहे. भारतीय वंशाच्या 14 वर्षीय अनिका चेब्रोलूने या तरूणीने  2020 3M आव्हान पूर्ण करत 25 हजार डॉलर म्हणजेच 18 लाख 35 हजार 375 रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. अनिकाने कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी प्रभावी ठरत असलेल्या थेरेपीचा शेध लावला आहे.  

या थेरेपीमध्ये  कोरोना व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनला बांधण्यासाठी एक रेणू शोधण्यात आला. त्यासाठी इन सिलिको पद्धतीचा वापर करण्यात आला होता. या कामगिरीबद्दल बोलताना अनिकाने सांगितले की, "गेल्या २ दिवसात मला दिसून आलं की, की माझ्या प्रोजेक्टबाबत चर्चा होत आहे. यात  कोरोना व्हायरसचा समावेश आहे आणि ही थेरपी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करेल.  लवकरच आपण सर्वांनी पूर्वीप्रमाणे आयुष्य जगावे, असं मला वाटतं."

दो साल तक रहें चौकन्ने

मुळची भारतीय असून अमेरिकेत वास्तव्यास असलेली अनिका  हिने आठवीत असतानाहा हा प्रकल्प तयार केला होता. पण कोरोनाच्या उपचारांसाठी हा प्रकल्प परिणामकारक ठरू शकतो याची तिला कल्पनाही नव्हती. आधी इन्फ्लूएंझा व्हायरसच्या प्रोटिनशी बांधले जाणारे लीड कंपाऊंड ओळखण्यासाठी इन-सिलिको पद्धती वापरण्याचे तिचा प्रयत्न होता. आता यात तंत्राचा वापर करून कोरोनाशी लढता येऊ शकतं. अनिकाचा हा प्रकल्प 3M Young Scientist Challengeमध्ये दाखल करण्यात आला होता. दरम्यान अनिकानं दिलेल्या माहितीनुसार, युवा शास्त्रज्ञाचा पुरस्कार मिळाला असला तरी तिचं काम अजूनही संपले नाही आहे. दिलासादायक! तरूणांसह वृद्धांमध्येही चीनी कंपनीच्या लसीचे सकारात्मक परिणाम; लवकरच लस येणार

अनिका म्हणली की, ''कोरोनाच्या औषधांवर माझे संशोधन सुरू आहे. आपण असं जगत आहोत हा विचारही वेडेपणा आहे. कोविड-19 संपूर्ण जगभर पसरत आहे. या व्हायरसच्या प्रभावामुळे कमी वेळात जगावर याचा गंभीर परिणाम झाला. त्यामुळे मी, माझ्या  मार्गदर्शकांच्या मदतीने, कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी दिशा बदलण्याचा विचार केलाय." कोरोना संसर्गामुळे शरीरावर होत आहेत 'असे' परिणाम; तज्ज्ञांनी केला खुलासा, जाणून घ्या उपाय

Web Title: Indian american 14 year old scientist discover cure covid-19 won 25 thousand dollar prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.