Indian coronavirus variant : समोर आला कोरोनाचा 'भारतीय स्ट्रेन'; महाराष्ट्रासाठी ठरतोय घातक; धोक्याचा इशारा देत तज्ज्ञ म्हणाले....
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 13:09 IST2021-04-05T13:08:58+5:302021-04-05T13:09:11+5:30
Indian coronavirus variant : या डबल म्यूटेंट भारतीय कोरोना वेरिएंट स्ट्रेनचा शोध एक महिना आधीच लावला होता. हा स्ट्रेन अधिक भयानक आणि संक्रामक असल्याचं सांगितलं जात आहे.

Indian coronavirus variant : समोर आला कोरोनाचा 'भारतीय स्ट्रेन'; महाराष्ट्रासाठी ठरतोय घातक; धोक्याचा इशारा देत तज्ज्ञ म्हणाले....
(Image Credit- Science)
ब्रिटन, दक्षिण आफ्रिकेनंतर आता कोरोनाचा भारतीय वेरिएंट आला आहे. या वेरिएंटनं संक्रमित रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातही या स्ट्रेनचा प्रसार झालेला पाहायला मिळत आहे. भारतीय कोरोना व्हायरसचा स्ट्रेन हा डबल म्यूटेंट आहे. म्हणजेच हा व्हायरस पुन्हा आपलं रूप बदलू शकतो. भारतीय व्हेरिएंट कितपत धोकादायक आहे. यााबबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
उत्तर कॅलिफोर्नियातील स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटीमधील (Stanford University) मधील हेल्थ केअर विभागातील प्रवक्ता लीसा किम यांनी सांगितले की, ''आमच्या शास्त्रज्ञांना भारतातील कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन मिळाला आहे. या वेरिएंटमध्ये दोनवेळा म्यूटेशन झालं असून कॅलिफोर्नियातील स्ट्रेनशी याचा संबंध आला होता. सॅन फ्रांसिस्कोमध्येही हा व्हायरस वावरत आहे. याची तपासणी क्लिनिकल वायरोलॉजी लॅबोरटरीमध्ये करण्यात आली होती. भारतातून अमेरिकेत आलेला हा पहिला कोरोनाचा वेरिएंट आहे. ''
First confirmed case of Indian coronavirus variant in U.S. found in California https://t.co/pOOmwyLPbEpic.twitter.com/KwdoySxyKh
— The Last Word (@TheLastWord) April 4, 2021
द एसोसिएटेड प्रेस (AP)च्या माहितीनुसार भारतीय संशोधकांनी या डबल म्यूटेंट भारतीय कोरोना वेरिएंट स्ट्रेनचा शोध एक महिना आधीच लावला होता. हा स्ट्रेन अधिक भयानक आणि संक्रामक असल्याचं सांगितलं जात आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या जितक्या केसेस समोर येत आहेत. त्यातील १५ ते २० टक्के प्रकरणं भारतीय कोरोना वेरिएंटची आहेत. अरे व्वा! आता वजन वाढण्याचं टेंशन सोडा; या नवीन औषधानं लठ्ठपणा होणार कमी, संशोधनातून दावा
डबल म्यूटेंटचा भारतीय कोरोना वेरिएंट फक्त महाराष्ट्रातच नाही तर अन्य काही राज्यांमध्येही पसरला आहे. या व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती लोकांच्या मनात आहे. कोरोनाची दुसरी लाट जास्त संक्रामक आणि जीवघेणी ठरू शकते असा अंदाच वर्तवला जात आहे. कोरोनापासून बचाव करण्यास निरुपयोगी ठरते व्हिटामीन C अन् झिंक; संशोधनातून खळबळजनक खुलासा