पूर्व अन् पश्चिम देशांच्या तुलनेत भारतीयांचा मेंदू असतो लहान- रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 02:44 PM2019-10-29T14:44:29+5:302019-10-29T14:49:14+5:30

भारतीय नागरिकांच्या मेंदूचा आकार हा पश्चिम अन् पूर्व देशांच्या तुलनेतील लोकांच्या मेंदूच्या आकारापेक्षा लहान असतो...

indian have smaller brain in size said study | पूर्व अन् पश्चिम देशांच्या तुलनेत भारतीयांचा मेंदू असतो लहान- रिसर्च

पूर्व अन् पश्चिम देशांच्या तुलनेत भारतीयांचा मेंदू असतो लहान- रिसर्च

Next

हैदराबाद: भारतीय नागरिकांच्या मेंदूचा आकार हा पश्चिम अन् पूर्व देशांच्या तुलनेतील लोकांच्या मेंदूच्या आकारापेक्षा लहान असतो, असं एका रिसर्चमधून समोर आलं आहे. भारतीयांच्या मेंदूची लांबी, रुंदी आणि जाडी या तिन्हीबाबतीत पूर्व आणि पश्चिमी देशांच्या तुलनेत छोटी असते. रिसर्चदरम्यान हैदराबादेतल्या आयआयटीद्वारे पहिल्यांदाच इंडियन ब्रेन एटलस विकसित करण्यात आले आहेत. हा रिसर्च अल्झायमर आणि इतर मेंदूंशी संबंधित आजारांना लक्षात घेऊन करण्यात आला आहे.

या सर्वेक्षणानंतर मेंदूशी संबंधित अनेक समस्या सोडवण्यासाठी मदत मिळणार असून, हा रिसर्च न्यूरॉलॉजी इंडिया नावाच्या मेडिकल जनरलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. हैदराबादेतल्या आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्थानमधल्या संशोधकांनी हे सर्वेक्षण केलं आहे. या प्रस्तावावर काम करणाऱ्या सेंटर फॉर व्ह्युजअल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे जयंती सिवास्वामी यांच्या मते, मेंदूशी संबंधित आजार शोधण्यासाठी मॉन्ट्रियल न्यूरॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (MNI) टेम्पलेटचा उपयोग केला जातो.

आतापर्यंत या टेम्पलेटला कोकेशियान मेंदूच्या आधारे विकसित करण्यात आले होते, जो की भारतातल्या मेंदूच्या आजारांचा शोध घेण्यासाठी एक उत्तम नमुना सिद्ध होऊ शकलेला नाही. पण आता भारतानं विकसित केलेल्या इंडियन ब्रेन एटलसमुळे मेंदूंशी संबंधित आजारांचं कारण समजू शकणार आहे. भारतीयांच्या मेंदूचा आकार इतर देशातील लोकांच्या तुलनेत छोटा असतो, असंही मॉन्ट्रियल न्यूरॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (MNI)नं सांगितलं आहे.

आम्ही MRI इमेजला प्रीलोडेड MNI इमेज टेम्पलेटशी तुलना केल्यानंतर हे समोर आलं आहे. आमच्याकडे या शोधासंदर्भात सबळ पुरावे आहेत. आतापर्यंत विकसित करण्यात आलेल्या टेम्पलेटमध्ये चिनी आणि कोरियाई ब्रेन टेम्पलेट्सचा समावेश होता, परंतु आतापर्यंत भारतानं विकसित केलेल्या टेम्पलेटचा समावेश करण्यात आलेला नव्हता. हैदराबादच्या आयआयटीच्या टीमनं या दिशेनं प्रयत्न केला असून, इंडियन ब्रेन स्पेसिफिक एटलस विकसित करण्यात आलं आहे. 

Web Title: indian have smaller brain in size said study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य