प्रोटीनबाबत भारतीयांमध्ये संभ्रम, 93 टक्के जनता फायद्यापासून अनभिज्ञ- रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 05:20 PM2019-12-04T17:20:30+5:302019-12-04T17:22:47+5:30
आयर्न आणि कॅल्शियमप्रमाणेच भारतीयांमध्ये प्रोटीनचीसुद्धा कमतरता असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
आयर्न आणि कॅल्शियमप्रमाणेच भारतीयांमध्ये प्रोटीनचीसुद्धा कमतरता असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. शहरातल्या 73 टक्के लोकसंख्येमध्ये प्रोटीनचा स्तर ठरावीक प्रमाणापेक्षा कमी असल्याचं आढळलं. तसेच जेवणात त्याचा का समावेश करावा, यासंदर्भात 93 टक्के लोक हे अनभिज्ञ आहेत. भारतीय लोक प्रोटीनला फार महत्त्व देत नाहीत. ते फक्त व्यायामशाळेत जाणाऱ्यांसाठी गरजेचं असल्याचाही एक मतप्रवाह आहे. इंडियन मार्केट रिसर्च ब्यूरोच्या सर्व्हेतून ही बाब समोर आलेली आहे.
रिपोर्टनुसार, देशातल्या 7 प्रमुख शहरांमध्ये केलेल्या सर्व्हेतून असं समोर आलं आहे की, डाएट प्रोटीनचा वापर वजन कमी करण्यासाठी होतो. 2018मध्ये इनबॉडी-आयपीएसओएसच्या सर्व्हेनुसार, 71 टक्के भारतीयांचे स्नायू कमकुवत असतात. त्यांच्या शरीरात 68% प्रोटीनची कमतरता असते, असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागातल्या जनतेमध्ये 56.5 ग्राम आणि शहरी भागातल्या भारतीयांमध्ये 55.7 ग्राम प्रोटीनचा अभाव असतो.
इंडियन मार्केट रिसर्च ब्यूरोच्या दुसऱ्या एका सर्व्हेतून देशातल्या प्रमुख शहरातील लोकांमध्ये प्रोटीनचा स्तर जास्त आहे. 90 टक्के लखनऊच्या लोकांमध्ये प्रोटीनचा स्तर तपासण्यात आलेला आहे. सर्वेक्षणातून लखनऊच्या 90 टक्के लोकांमध्ये प्रोटीनची कमतरता असल्याचं समोर आलं आहे. अहमदाबाद आणि चेन्नईतली 84 टक्के जनतेमध्ये प्रोटीनची कमी जाणवली आहे. तर तिसऱ्या स्थानी विजयवाडा (72%) आणि मुंबई (70%) आहे. दिल्लीत हा आकडा 60 टक्क्यांवर आहे. या सर्व्हेत 1800 लोकांचा समावेश करण्यात आलेला असून, त्यांच्या जेवणा-खाण्याच्या पद्धतीचं विश्लेषण करण्यात आलं आहे.
इंडियन डायटिक असोसिएशननुसार, भारतीयांच्या खानपानाच्या गरजेच्या मात्रेनुसार 50 टक्के प्रोटीन मिळतं. प्रोटीन मुलांना विकासाशिवाय त्यांच्या विचार करण्याच्या आणि समजून घेण्याच्या क्षमतेत वाढ करते. स्नायूंसाठी हे जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच शरीरातील रोगांशी लढण्याची क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच त्वचा आणि केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी शरीरात पर्याप्त प्रोटीन असणं आवश्यक आहे.