​देशातील पहिली गर्भाशय ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया पुण्यात यशस्वी !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2017 11:21 AM2017-05-19T11:21:59+5:302017-05-19T16:51:59+5:30

अशी शस्त्रक्रिया देशातील पहिलीच असल्याने त्याकडे वैद्यकीय जगतासह सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते.

India's first uterine transplant surgery is successful in Pune! | ​देशातील पहिली गर्भाशय ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया पुण्यात यशस्वी !

​देशातील पहिली गर्भाशय ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया पुण्यात यशस्वी !

googlenewsNext
लापुरातील २१ वर्षीय तरुणीच्या शरीरात तिच्याच आईचे गर्भाशय ट्रान्सप्लांट करण्याची शस्त्रक्रिया पुण्यात यशस्वी झाली. अशी शस्त्रक्रिया देशातील पहिलीच असल्याने त्याकडे वैद्यकीय जगतासह सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. ‘पुण्यातील गॅलेक्सी केअर लेप्रोस्कोपी इन्स्टिट्यूट’ या हॉस्पिटलमध्ये ही गर्भाशय ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली. 
या ट्रान्सप्लांटमुळे महिलेला स्वत:चे बाळ जन्माला घालणे शक्य होणार आहे. या हॉस्पिटलमध्ये तीन महिलांमध्ये गर्भाशयाचे ट्रान्सप्लांट करण्यात येणार आहे. त्यापैकी पहिली शस्त्रक्रिया पार पडली आहे. या प्रक्रिया शेवटपर्यंत यशस्वी झाल्यास आईने दान केलेल्या गर्भाशयामुळे मुलीला स्वत:चे बाळ जन्माला घालता येणार आहे. सध्या ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली, तरी तीन आठवड्यानंतरच त्याची यशस्वीतता खऱ्या अर्थाने समजू शकेल, अशी माहिती ‘गॅलेक्सी केअर लेप्रोस्कोपी इन्स्टिट्यूट’ हॉस्पिटलने दिली आहे.
गर्भाशयाचे प्रत्यारोपण करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकातील डॉ. शैलेश पुणतांबेकर, डॉ. पंकज कुलकर्णी आणि डॉ. मिलिंद तेलंग यांनी स्वीडनला जाऊन गर्भाशयाच्या ट्रान्सप्लांटची माहिती घेतली होती. डॉ. पुणतांबेकर यांनी जर्मनीत जाऊन ट्रान्सप्लांटचे प्रशिक्षण घेतले आहे. या प्रशिक्षणात ट्रान्सप्लांटच्या नियमांची माहिती, पेशंटची निवड व प्रत्यक्ष प्रक्रिया आदीचा समावेश होता. स्वीडनमध्ये ओपन सर्जरी करण्यात आली होती. पुण्यात दात्याचे गर्भाशय हे दुर्बिणीद्वारे काढण्यात येणार होते.
शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असली तरी दाता आणि संबंधित युवती यांना पुढील दोन दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात येईल. त्यानंतर तीन आठवडे त्यांना तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येईल. तीन आठवड्यांनंतर गर्भाशयाचे कार्य आणि रक्तपुरवठा यावरच त्याची यशस्वीतता अवलंबून असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Web Title: India's first uterine transplant surgery is successful in Pune!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.