पोटाच्या रोजच्या तक्रारी ठरू शकतात IBD समस्येचं कारण; वाचा लक्षणं आणि उपाय

By Manali.bagul | Published: September 21, 2020 05:46 PM2020-09-21T17:46:39+5:302020-09-21T18:14:05+5:30

या आजाराच्या सुरूवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास समस्या वाढत जाऊ शकते किंवा या समस्यांचे गंभीर आजारात रुपांतर होऊ शकतं.

Inflammatory bowel disease also may reason of stomach bloating know about idb | पोटाच्या रोजच्या तक्रारी ठरू शकतात IBD समस्येचं कारण; वाचा लक्षणं आणि उपाय

पोटाच्या रोजच्या तक्रारी ठरू शकतात IBD समस्येचं कारण; वाचा लक्षणं आणि उपाय

googlenewsNext

दिवसभरात आपण वेगवेगळ्या पदार्थाचे सेवन करत  असतो. गॅस, एसिडीटी, पोटात जळजळ होणं अशा अनेक समस्या या आयबीडीमुळे (इंफ्लामेट्री बाउल डिसीज (IBD))  उद्भवतात. या आजाराच्या सुरूवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास समस्या वाढत जाऊ शकते किंवा या समस्यांचे गंभीर आजारात रुपांतर होऊ शकतं. गॅस पोट फुगणं, आतड्यांना सुज येणं अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.  इंफ्लामेट्री बाउल डिजीज (Inflammatory bowel disease (IBD) हा एक पचनक्रियेशी निगडीत आजार आहे. पोटाच्या अनेक समस्या या एका आजारामुळे उद्भवू शकतात. याबाबत माहिती हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. 

आयबीडीचे कारणं  आणि प्रकार

नवभारत टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार पचनसंस्थेला सूज येण्याची किंवा मंदावण्याची अनेक कारणं आहेत. सगळ्यात मोठं कारण बॅक्टेरिया  आणि व्हायरसचं संक्रमण हे समजलं जातं. अनेकदा अनुवांशिकतेने ही समस्या उद्भवू शकते. त्यामुळे शरीरात ऑटोइम्यून रिस्पॉन्स दिसून येतो. आयबीडीचे अनेक प्रकार आहेत. त्यातील एक क्रन्हॉन्स डिजीज, दुसरा प्रकार अल्सरेटिव्ह कोलायटिस हा आहे. अल्सरेटिव्ह कोलायटिस असल्यास मोठ्या आतड्यांना सुज येते. ही सूज वाढत गेल्यास रुग्णांच्या जीवाला धोका असतो.  

लक्षणं

तीव्रतेनं पोटदुखी होणं

मल विसर्जन करताना रक्तस्त्राव होणं

डायरिया, उलटी होणं 

भूक कमी होणं

अचानक वजन कमी होणं

सूज येणं

पित्त वाढणं

थकवा येणं

ताण-तणाव

उपाय 

पोट फुगल्यासारखे वाटत असेल, दुखत असेल किंवा गॅस निघण्यासही समस्या होत असेल तर तुमच्या आहारात लसणाचा समावेश करा. हळूहळू आहारातील लसणाचं प्रमाण वाढवा. याने तुमची पचनक्रिया चांगली होते आणि आतड्यांमध्ये फसलेले बॅक्टेरिया बाहेर येतील.

दह्यामध्ये बॅक्टेरिया असतात ज्याने आपली पचनक्रिया चांगली राहते. याने अन्न पचायला मदत मिळते. गरमीच्या दिवसात दही खाल्याने गॅसची समस्याही होत नाही, तसेच पोटही फुगत नाही. शक्यतो दुपारच्या जेवणासोबत ताक किंवा दही घेतल्यास आराम मिळेल.

आलं हा पोटाशी निगडीत वेगवेगळ्या समस्या दूर करण्यावर रामबाण उपाय मानला जातो. याचा वापर तुम्ही चहामधून किंवा एखाद्या पदार्थामधून करु शकता. २ ते ३ दिवस हे खाल्यास पोट फुगण्याची समस्या दूर होईल. ब्लोटिंगचं मुख्य कारण गॅस तयार होणं हे आहे. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता. याने पोटात गॅस तयार होणार नाही.

दोन मोठे चमचे धने पावडर अर्धा चमचा सुंढ दोन ग्लास पाण्यात उकळून घ्या. हे पाणी उकळून प्या. पाणी पूर्णपणे उकळून झाल्यानंतर थंड करून ४-४ चमचे या पाण्याचे सेवन करा. या पाण्याचे सेवन केल्यामुळे  तुमची खराब पचनशक्ती चांगली राहण्यास मदत होईल.

पोट साफ होण्यास त्रास होत असेल तर  रात्री झोपताना एक ग्लास गरम दूध घ्या. त्याचबरोबर दुधात २ ते ३ चमचे एरंडेल तेल टाका आणि ते दूध प्या. असे केल्याने आतड्यांमध्ये साठून राहिलेला मल बाहेर येण्यास मदत होईल. याशिवाय जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. 

खाल्लेल्या अन्नाचं पचन होण्यासाठी घाईत जेवणं टाळा. घाईघाईत खाताना प्रमाणापेक्षा अधिक खाल्लं जातं. म्हणूनच एका जागेवर शांत बसून आणि वेळेवर खायला हवं. पोट भरल्याची सूचना शरीरातील हामोर्न्स मेंदूला देतात आणि आपण गरजेपेक्षा अधिक न खाता, हवं तेवढंच खातो. तसंच हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करून तुम्ही आपली पचनशक्ती नेहमी चांगली ठेवू शकता. 

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

हे पण वाचा

भय इथले संपत नाही! चीनमध्ये नव्या माहामारीचा शिरकाव; आत्तापर्यंत हजारो लोकांना संसर्ग

तुम्हालाही अचानक BP चा त्रास होतो? तज्ज्ञांनी सांगितले 'बीपी' नियंत्रणात ठेवण्याचे सोपे उपाय

भारतातही कोरोनाची लस मोफत मिळणार? अमेरिकेने केली मोठी घोषणा

आरोग्यदायी दुधीच्या सालीचे 'हे' फायदे वाचाल; तर फेकून देताना १० वेळा विचार कराल

काळजी वाढली! अजून २ वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा

Web Title: Inflammatory bowel disease also may reason of stomach bloating know about idb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.