सर्दी-खोकला मामुली वाटला तरी दुर्लक्ष नको, H3N2 व्हायरसनं आजारी पडताहेत लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 08:00 PM2023-03-06T20:00:55+5:302023-03-06T20:02:11+5:30

देशात कोरोना व्हायरसची रुग्णसंख्या कमी होत आहे. पण सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढत आहेत.

influenza type a h3n2 cases rising in india know influenza flu symptoms severity treatment who icmr | सर्दी-खोकला मामुली वाटला तरी दुर्लक्ष नको, H3N2 व्हायरसनं आजारी पडताहेत लोक

सर्दी-खोकला मामुली वाटला तरी दुर्लक्ष नको, H3N2 व्हायरसनं आजारी पडताहेत लोक

googlenewsNext

नवी दिल्ली-

देशात कोरोना व्हायरसची रुग्णसंख्या कमी होत आहे. पण सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढत आहेत. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या म्हणण्यानुसार हे रुग्ण इन्फ्लूएंजा व्हायरसमुळे होत आहे. 

आयसीएमआरच्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन-तीन महिन्यांपासून इन्फ्यूएंजा व्हायरसचे A सबटाइप H3N2 मुळे ताप आणि सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार H3N2 मुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण देखील वाढत आहे. 

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या म्हणण्यानुसार सध्या वातावरणातील बदलामुळे तापाची साथ आहे. जो पाच ते सात दिवसांपर्यंत राहतो. आयएमएनं ताप किंवा सर्दी-खोकला झाल्यावर एंटीबायोटीक न घेण्याचा सल्ला दिला आहे. 

आयएमएच्या म्हणण्यानुसार ताप तीन दिवसांमध्ये जातो. पण सर्दी-खोकला तीन आठवडे राहत आहे. प्रदुषणच्या समस्येमुळेही १५ वर्षांपेक्षा कमी आणि ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये श्वास घेण्याच्या त्रासाचे रुग्ण वाढत आहेत. 

इनफ्लूएंजा म्हणजे काय?
- जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार वातावरणीय इन्फ्लूएंजा व्हायरस चार प्रकारात- A, B, C आणि D असे आढळतात. यात A आणि B टाइपचे वातावरणीय फ्लू पसरतो. 

- इन्फ्लूएंजा A टाइप हे महामारीचं कारण मानलं जात आहे. इन्फ्लूएंजा टाइप A चे दोन सबटाइप आहेत. एक आहे H3N2 आणि दुसरा H1N1 

- इन्फ्लूएंजा टाइप B चे सबटाइप नाहीत. पण याचे लाइनेज असू शकतात. टाइप C अत्यंद हलका मानला जातो आणि धोकादायक नसतो. तर टाइप D मासपेशींमध्ये पसरतो. 

- आयसीएमआरच्या माहितीनुसार, काही महिन्यांत कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. पण H3N2 चे रुग्ण वाढले आहेत. सर्व्हिलन्स डेटानसार १५ डिसेंबरनंतर H3N2 चे रुग्ण वाढले आहेत. 

लक्षणं कोणती?
- WHO नुसार वातावरणातील इन्फ्ल्यूएन्जानं संक्रमित झाल्यानं ताप, खोकला, डोकेदुखी आणि मांसपेशी तसंच सांधेदुखी, थकवा, घशात खवखव आणि नाक वाहण्याची लक्षण आढळून येतात. 

- बहुतांश लोकांचा ताप एका आठवड्यात कमी होतो. पण खोकला बरा होण्यासाठी दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागतो. 

Web Title: influenza type a h3n2 cases rising in india know influenza flu symptoms severity treatment who icmr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य