कोरोनानंतर Influenza Virus ने वाढवली चिंता, बचावासाठी 'असा' घ्या घरगुती पोषक आहार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 02:18 PM2023-03-20T14:18:07+5:302023-03-20T14:18:37+5:30

या व्हायरसपासून सुरक्षेसाठी आहारात काही गोष्टी सामील करणं गरजेचं आहे.

influenza virus h3n2 have such diet to avoid growth of virus in your body here are tips | कोरोनानंतर Influenza Virus ने वाढवली चिंता, बचावासाठी 'असा' घ्या घरगुती पोषक आहार

कोरोनानंतर Influenza Virus ने वाढवली चिंता, बचावासाठी 'असा' घ्या घरगुती पोषक आहार

googlenewsNext

सध्या सगळीकडे इंफ्लुएंझा व्हायरल एच३एन२ (Influenza Virus H3N2) ने चिंता वाढवली आहे. या व्हायरसचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत. तसेच याचेी लक्षणही किरकोळ आहेत. सर्दी, खोकला, अंगदुखी अशा नेहमीच्या लक्षणांमुळे व्हायरस तेजीने पसरतोय. कोरोना प्रमाणेच या व्हायरसनेही डोकेदुखी वाढवली आहे. यापासून बचावासाठी प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या व्हायरसपासून सुरक्षेसाठी आहारात काही गोष्टी सामील करणं गरजेचं आहे. आहारातील काही विशिष्ट गोष्टींमुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ती सुधारण्यास नक्कीच मदत होईल.

दालचिनी : दालचिनीमध्ये अनेक औषधी गुणांचा समावेश आहे. दालचिनी रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास  मदत करते. याशिवाय यामध्ये पुरेपूर अॅंटिऑक्सिडंट्सचा समावेश असतो. शरीराला धोकादायक मॉलिक्युल्स आणि फ्री रेडिकल्सपासून वाचवण्यासाठी दालचिनीचा वापर होतो. शरिरात कोणताही व्हायरल आणखी पसरु नये म्हणून त्याला वेळीच थांबवण्याचे कामही दालचिनी करते. 

मेथीचे दाणे : आयुर्वेदात मेथीच्या दाण्यांचा फायदा सांगितला आहेच. वैद्यकीय अभ्यासानुसार हे लक्षात आले आहे की,  मेथीच्या दाण्यांमध्ये सैपोनिन, फ्लेलेवोनोइड्स आणि अल्कलॉइड्स सारखे गुणधर्म असतात. यामध्ये रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याची ताकद असते.तसेच हे पांढऱ्या रक्तपेशी वाढवण्याचेही काम करते. इन्फेक्शन आणि इतर आजारांना लढा देण्यामध्ये यांची महत्वपूर्ण भूमिका असते. मेथीच्या दाण्यांचा वापर आयुर्वेद आणि इतर पारंपारिक वैद्यकीय प्रक्रियांमध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठी केला जातो. हे व्हिटॅमिन ए आणि सी ने भरपूर असतात.सोबतच यामध्ये आयर्न, झिंक आणि सेलेनियम सारखे मिनरल्स असतात.

आलं : आलं खाल्ल्याने खोकला आणि घशाला आराम मिळतो.यातील औषधी गुणधर्म अनेक इन्फेक्शनपासून रक्षण करते. तसेच पांढऱ्या रक्तपेशींनाही उत्तेजन देते. यामध्ये अॅंटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांचा समावेश असतो. ज्यामुळे बॅक्टेरिया किंवा व्हायरसचा शरिरात प्रसार होत नाही.

हळद : कोणत्याही आजारावर हळद रामबाण उपाय समजला जातो. याचा वापर हिवाळ्यात औषधी स्वरुपात केला जातो.हळदीत करक्युमिन नावाचे कंपाऊंड आढळून येते जे अँटिऑक्सिडंट आणि अँटीइंफ्लामेटरी गुणांनी परिपूर्ण असते. 

लवंग : लवंग मध्ये असे काही कंपाऊंड असतात जे इम्युन सिस्टीम सुधारण्यास मदत करतात. जसे की युजेनॉल. यामध्ये अँटिइन्फ्लामेटरी आणि अँटीऑक्सीडंट सारखे गुण असतात. सोबतच व्हायरसला नष्ट करण्यासाठी यामध्ये अँटीवायरल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणही असतात.

Web Title: influenza virus h3n2 have such diet to avoid growth of virus in your body here are tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.