जळीत महिलेचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू ७० टक्के भाजली : पतीकडून त्रास असल्याचा भावाचा आरोप
By admin | Published: March 27, 2016 12:45 AM2016-03-27T00:45:39+5:302016-03-27T00:45:39+5:30
जळगाव : शहरातील राधाकृष्ण नगरमधील आशा सखाराम सोनवणे (४०) या ७० टक्के भाजलेल्या महिलेचा शनिवारी संध्याकाळी मृत्यू झाला. दरम्यान, पतीच्या जाचामुळे आशा सोनवणे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेचा भाऊ भैया आधार साळुंखे (रा. अडावद) यांनी केला आहे.
Next
ज गाव : शहरातील राधाकृष्ण नगरमधील आशा सखाराम सोनवणे (४०) या ७० टक्के भाजलेल्या महिलेचा शनिवारी संध्याकाळी मृत्यू झाला. दरम्यान, पतीच्या जाचामुळे आशा सोनवणे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेचा भाऊ भैया आधार साळुंखे (रा. अडावद) यांनी केला आहे. आशा सोनवणे या जळाल्यामुळे सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सदर महिलेचा मृत्यू झाला. याबाबत महिलेच्या भावाने सांगितले की, आशाबाईचे पती दारू पिऊन तिला शिवीगाळ व मारहाण करायचे. तू येथून निघून जा, अन्यथा तुला पेटवून देईल, असे धमकावत होते. त्यामुळेच बहिणीचा जळून मृत्यू झाला असा आरोप भैया साळुंखे यांनी केला आहे. सकाळी महिला बेशुद्ध असताना पोलिसांनी तिचा जबाबावर केवळ अंगठा घेतला, असा आरोपही साळुंखे यांनी केला आहे.