मानसिक आरोग्यासाठी धोकादायक आहे इन्स्टाग्राम, जाणून घ्या कसं?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 10:57 AM2019-01-14T10:57:36+5:302019-01-14T11:00:11+5:30
सोशल मीडियाच्या दुष्परिणामांबाबत नेहमीच बोलण्यात आलं आहे. फेसबुकचा कसा वाईट प्रभाव पडतो, हे वेळोवेळी समोर आलं आहे.
आजकाल तरुणाई त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा सोशल मीडियावर घालवतात. इन्स्टाग्रामपासून ते फेसबुक, व्हॉट्सअॅप स्टेटस चेक करणे, फोटोज आणि मेसेज पाठवणे या गोष्टी त्यांच्या जगण्याचा भाग झाल्या आहेत. सोशल मीडियाच्या दुष्परिणामांबाबत नेहमीच बोलण्यात आलं आहे. फेसबुकचा कसा वाईट प्रभाव पडतो, हे वेळोवेळी समोर आलं आहे. आता इन्स्टाग्रामने होणाऱ्या नुकसानाबाबत एका रिसर्चमधून चिंताजनक बाब समोर आली आहे. इन्स्टाग्रामचा वापर मानसिक आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे.
रिसर्चमधून खुलासा..
इन्स्टाग्राम कसं मानसिक आरोग्यासाठी हानिकारक आहे. हे नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे. रॉयल सोसायटी फॉर पब्लिक अँन्ड यंग हेल्थ मुव्हमेंट द्वारे करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, इन्स्टाग्राम मानसिक आरोग्यसाठी फार हानिकारक आहे. तर याबाबत स्नॅपचॅट दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तरुणांवर करण्यात आला सर्व्हे
या सर्व्हेसाठी यूकेमध्ये राहणाऱ्या १, ५०० तरुणांना ५ सर्वात जास्त लोकप्रिय सोशल मीडियाच प्लॅटफॉर्मला रेटींग देण्यासाठी सांगण्यात आलं. यात फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, यूट्यूब आणि ट्विटरचा समावेश होता. याचा तरुणांची झोप, डिप्रेशन, फिअर ऑफ मिसिंग आऊट आणि बॉडी इमेजवर काय प्रभाव पडतो, या आधारावर रेटींग केलं जाणार होतं.
इन्स्टाग्राम सर्वात धोकादायक
या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या सकारात्मक आणि नकारात्मक प्रभावांच्या आधारावर रेटींग केलं गेलं. या सर्वच ५ अॅप्समध्ये इन्स्टाग्रामला सर्वात धोकादायक अॅप मानलं गेलं. इन्स्टाग्रामसोबत सर्वात मोठी समस्या ही आहे की, हे मुली आणि महिलांमध्ये त्यांचीच इमेज आणि बॉडी लूकबाबत असुरक्षितता तयार करतं. याचं कारण आहे फोटोशॉप्ड करण्यात येत असलेले फोटो.
इन्स्टाग्रामसाठी खास फोटो सेशन
परफेक्ट दिसण्यासाठी इन्स्टाग्रामचा तरुणांवर इतका प्रभाव आहे की, ते सोशल मीडियावर फोटो पोस्ट करण्यासाठी खासकरुन फोटो काढतात. ते फोटो फिल्टर करण्यासाठीही बराच खर्ची करतात.