घरातील प्रदूषण दूर करण्यासाठी एअर प्युरिफायर नाहीतर 'ही' झाडं लावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 03:55 PM2019-11-04T15:55:36+5:302019-11-04T15:57:16+5:30
शहरांमधील हवा अलिकडे फारच प्रदूषित झाल्याचे कुणीही नाकारणार नाही. अशात जर तुम्हाला वाटत असेल की, वायु प्रदूषण केवळ घराबाहेर आहे आणि घरात तुम्ही सुरक्षित आहात तर असे अजिबातच नाहीये.
शहरांमधील हवा अलिकडे फारच प्रदूषित झाल्याचे कुणीही नाकारणार नाही. अशात जर तुम्हाला वाटत असेल की, वायु प्रदूषण केवळ घराबाहेर आहे आणि घरात तुम्ही सुरक्षित आहात तर असे अजिबातच नाहीये. घरातील हवा सुद्धा अनेकदा प्रदूषित आणि हानिकारक होते. त्यामुळे घरातील हवा प्रदूषण मुक्त करण्यासाठी अनेकजण एअर प्युरिफायरचा वापर करु लागले आहेत. पण अनेकदा हा उपाय खर्चिक असतो. आज आम्ही तुम्हाला त्यापेक्षा स्वस्त आणि फायदेशीर उपाय सांगणार आहोत. आपण जाणून घेऊया काही इनडोअर झाडांबाबत जी तुम्ही घरात ठेवून हवा स्वच्छ करू शकता.
ऐरेका पाम
ऐरेका पाम हवेतील फार्मेल्डिहाइड, कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन मोनोऑक्साइड यांसारखे विषारी वायू दूर करण्याचं काम करून शुद्ध ऑक्सिजन देतो. जर तुम्हाला घरातील हवा शुद्ध ठेवण्यासोबतच ऑक्सिजनचं प्रमाणही वाढवायचं असेल तर कमीत कमी 4 झाडं लिविंग रूममध्ये किंवा गॅलरीमध्ये लावा. हे झाडं नर्सरीमध्ये 200 ते 250 रूपयांमध्ये मिळतं.
पीस लिली
पीस लिली वातावरणातील हानिकारक आणि आजारांसाठी कारणीभूत ठरणारे कण दूर करून हवा शुद्ध करण्यासाठी मदत करतात. रात्रीच्या वेळी जिथे झाडं कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित करतात. तेच हे झाड रात्रीही ऑक्सिजन उत्सर्जित करतं. हे झाड 150 रूपयांना सहज उपलब्ध होतं.
रबड प्लांट
तुम्ही घरासोबतच ऑफिसमध्येही हे झाड ठेवू शकता. यासाठी थोडसं ऊनही पुरेसं असतं. यामध्ये ऑफिसचे वुडन फर्निचरमुळे तयार होणारे हानिकारक ऑर्गेनिक कंपाउंड फॉर्मलडिहाइड नष्ट करण्याची क्षमता असते. घरातही तुम्ही हे झाड सोफा किंवा बेडच्या जवळ ठेवू शकता. हे झाड हवेतील विषारी कण दूर करू शकतात. साधारणतः 150 रूपयांना हे झाड बाजारात उपलब्ध होते.
मनी प्लांट
मनी प्लांट अधिकाधिक घरांमध्ये पाहायला मिळतात. हवा शुद्ध करण्यासाठी हे मदत करतात. तसेच हे अगदी सहज वाढतात. घरातून कार्बन मोनोऑक्साइड आणि कार्बन डायऑक्साइड यांसारखे विषारी वायू दूर करतं. तसेच घरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी मदत करतं. हे 200 ते 300 रूपयांपर्यंत उपलब्ध होतं.
तुळस
दिवसाच्या 24 तासांपैकी 20 तास ऑक्सिजन आणि चार तासांसाठी ओझोन गॅसचं उत्सर्जन करणारी तुळस अत्यंत फायदेशीर ठरते. वातावरणातील कॉर्बन मोनोऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड शोषून वातावरण शुद्ध करण्यासाठी मदत करतं. यामध्ये वातावरणातील बॅक्टेरिया नष्ट करण्याची क्षमता असते.
स्नेक प्लांट
स्नेक प्लांट वातावरणातील घातक तत्व फॉरमलडिहाइड फिल्टर करण्यासाठी मदत करते. या झाडाला जास्त पाणी किंवा उन्हाचीही गरज भासत नाही. हे तुम्ही बेडरूम किंवा बाथरूममध्ये लावू शकता. हे झाड कार्बन डायऑक्साइड घेऊन ऑक्सिजन सोडतं. बाजारात 100 ते 200 रूपयांना अगदी सहज उपलब्ध होतं.
बांबू पाम
बांबू पामला रीड हथेली किंवा बांसचं झाड म्हणूनही ओळखलं जातं. हे झाड हना फ्रेश करून घराची सजावट करण्यासाठीही फायदेशीर ठरतं. झाड पटकन वाढतं. हे तुम्ही फर्निचरच्या आजूबाजूला ठेवू शकता.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)